Homeअकोल्याच्या 'लढे' कुटुंबास असा दिला खेडकर नगरवासियांनी भावपूर्ण निरोप

अकोल्याच्या ‘लढे’ कुटुंबास असा दिला खेडकर नगरवासियांनी भावपूर्ण निरोप

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : कधी कधी नात्यागोत्यांपेक्षाही आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी मित्रमंडळी अधिक जवळची वाटावयास लागते. जेव्हा आपल्या परिसरात अर्धशतक म्हणजे सुमारे 50 वर्षे राहून जीवाभावाचे नाते जोडणारे कुटुंब आपला निरोप घेऊन लांबच्या गावी राहावयास जाते. तेव्हा साहजिकच मनाला वेदना झाल्याशिवाय राहत नाहीत. या वेदना होण्यासाठी आपल्या मनातही कुठेतरी प्रेमाचा, स्नेहाचा, आपुलकीचा ओलावा असावा लागतो.


स्थानिक खेडकर नगर मधील असेच एक जीवाभावाचे विनोद लढे व सरलाताई लढे मागील 50 वर्षे वास्तव्यास असलेले कुटुंब ! जठारपेठ उमरी मार्गावरील विशाल प्रोव्हिजन या नावाने किराणा व धान्य विक्रीचा व्यवसाय करणारे विनोद लढे आपल्या व्यवसायाने सर्वदूर परिचित आहेत.जेव्हा हे कुटुंब आता मुंबई नगरीत वास्तव्यास जाऊ लागले आहे.हे माहिती होता शेजारच्या लोकांना गहीवरून आले. तेव्हा खेडकर नगरातील काही कुटुंबांनी एकत्रित येऊन, लढे दाम्पत्याला भावपूर्ण निरोप दिला. विनोदरावांचे वय 75 व सरलाताईंचे वय 70 वर्षाचे आहे. यावेळी लढे कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते.

आपल्या भावपूर्ण निरोप समारंभात, हा केवळ शेजारील लोकांनी दिलेला निरोप समारंभ नाही. गत ५० वर्षांपासून दिलेले सहकार्य, सन्मान आणि आपुलकीची ही वागणूक म्हणजे ऋणानुबंधाचा गाठी आहेत.ते विसरता येणार नाही. असं म्हणत असताना लढे दाम्पत्याचे डोळे पाणावले होते.

त्यांच्या या निरोप सोहळ्यास खेडकर नगरातील प्रदीप खाडे, विठ्ठलराव जायले, निरंजन गव्हाळे, विजयराव उमरीकर, दिलीप देशमुख, हर्षवर्धन भिसे, अभिजीत उमरीकर, देशमुख, प्रतिभा खाडे, अपर्णा भिसे, पल्लवी खाडे, सारिका उमरीकर, सुशीला जायले, आशा गव्हाळे, शुभांगी देशमुख, स्मिता अढाऊ, प्रज्ञा वालोकार, अवंती उमरीकर यांचासह इतरही स्नेही मंडळी उपस्थित होती. याप्रसंगी लढे परिवारासह प्रदीप खाडे व इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रदीप खाडे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular