अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : शहरातील दोन पोलिस ठाण्यात दाखल दोन गंभीर स्वरूपाच्या तक्रारींचा अनुषंगाने पोलिसांचा कार्यपद्धती बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.तेव्हा या तक्रारींची योग्य नोंद घेऊन कायद्यानुसार कारवाई करावी आणि उपलब्ध पुराव्यांचे संरक्षण करावे, अशी मागणी अकोला शिवसेना कायदे विभागाच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे दोन स्वतंत्र निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे.या दोन्ही प्रकरणांची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षकांनी संबंधित यंत्रणेला आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती शिवसेना विधी सेलकडून देण्यात आली आहे.

पहिल्या निवेदनात वेदांत विक्रांत वाघमारे (वय 17) या अल्पवयीन मुलासंदर्भातील प्रकरणात खदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या NCR क्रमांक 1299/2026 बाबत आक्षेप नोंदविण्यात आला आहे. प्रकरणात लागू होणाऱ्या POCSO अधिनियम 2012 मधील कलम 12, किशोर न्याय अधिनियम 2015 मधील कलम 75 तसेच BNS मधील संबंधित कलमांनुसार NCR ऐवजी FIR दाखल करून निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुसऱ्या निवेदनात शिवसेना शहरप्रमुख रमेश गायगावकर यांनी पोलीस अंमलदार श्याम श्रीराम शर्मा व त्यांच्या मुलाविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. 16 ग्रॅम सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेणे, मारहाण, जीवे मारण्याची धमकी, तक्रार दडपण्याचा प्रयत्न तसेच घटनेचे CCTV पुरावे नष्ट केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणात BNS मधील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करून निष्पक्ष तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनांची पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तपास व आवश्यक कायदेशीर कारवाईचे निर्देश दिल्याने, आता या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
यावेळी जिल्हा प्रमुख अश्विन नवले, जिल्हा अध्यक्ष रेखा राऊत जिल्हाध्यक्ष शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना, रेखा वारके जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल, निशा ग्यारल महानगर अध्यक्ष, रमेश गायकवाड शहर प्रमुख, विधि सेल जिल्हा प्रमुख अँड पवनेश अग्रवाल राजेश दांडेकर उपशहर प्रमुख, लता सुतार, रंजना रंभेकर, जिल्हा उपाध्यक्ष, उज्वाला बावस्कर जिल्हा संघटक, माधुरी फुरसुंले जिल्हा सचिव नम्रता निचळे, अकोला तालुका अध्यक्ष, प्रियंका जाधव पातुर तालुका अध्यक्ष, कल्पना बिडवे, विभागीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ, विनायकराव पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष, संजय सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष अकोला, प्रदीप लुगडे महानगर अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ अकोला. पुष्पा कांबळे, आकाश हिरोळे विभागीय अध्यक्ष.श्रमिक कामगार सेना आदी पदाधिकारी उपस्थित होते

