• पुणे-मुंबईसारख्या टाऊनशिप आता आपल्या बजेटमध्ये • अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अकोल्यातील हजारो मुलं-मुली आज पुणे, मुंबई, नागपूर, हैदराबाद, बंगळुरू आणि परदेशातही शिक्षण घेत आहेत, नोकरी-व्यवसायात यश मिळवत आहेत. ही आपल्या शहराची अभिमानाची गोष्ट आहे. पण या प्रत्येक यशस्वी तरुणाच्या मनात एक कोपरा जसा असतो, जो नेहमी आपल्या गावाकडे, आई-वडिलांकडे आणि आपल्या मातीकडे ओढ घेत असतो. “एक दिवस आपल्या शहरात स्वतःचं घर घ्यायचं हे स्वप्न पूर्ण करण्यास यंदाची दिवाळी हा सर्वोत्तम मुहूर्त ठरू शकतो. पंकज कोठारी यांच्या कोठारी कंस्ट्रक्शन कंपनीने (KCC) अकोल्यात उभारलेल्या प्रकल्पांमध्ये रेडी पड़झेशन घरं उपलब्ध असून, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बुकिंगची संधी देण्यात आली आहे.

मोठ्या शहरात भाडं, आपल्या शहरात मालकी. : पुणे-मुंबई शहरांमध्ये दर महिन्याला मोठं भाडं भरलं जातं, पण ते घर कधीच आपलं होत नाही. त्याच रकमेत वा त्याहून कमी हप्त्यात आपल्या अकोल्यात स्वतःच्या मालकीचं, आधुनिक सुविधांनी युक्त घर घेता येतं. आज घेतलेलं घर म्हणजे उद्याची मजबूत संपत्ती आई-वडिलांसाठी आरामदायी निवारा, भाड्याचं उत्पन्न देणारी गुंतवणूक आणि भविष्यात परत आल्यावर हक्काचं घरटं. “अजून वेळ संपली नाही, नव्याने सुरुवात करा नव्या घराता”
रेडी पझेशन – घर तयार, ताबा त्वरित : बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पात वर्षानुवर्षे वाट पाहण्याची गरज नाही. KCC चे प्रकल्प पूर्ण झालेले असून घरं ताबा देण्यासाठी तयार आहेत. जे दिसतंय तेच मिळतंय तयार घर प्रत्यक्ष पाहून निर्णय घेता येतो आणि बुकिंगनंतर लगेच गृहप्रवेश करता येतो.
कागदावरचे नाही, प्रत्यक्ष जगलेले स्वप्न : KCC च्या घरांची खरी ओळख म्हणजे तिथे राहणारी आनंदी कुटुंब. गीता नगर येथील लोटस ग्रीन टाऊनशिपमध्ये मागील दोन वर्षांपासून कुटुंबं राहत आहेत, तर MIDC-शिवणी येथील लोटस पार्क टाऊनशिपमध्ये मागील एक वर्षापासून रहिवासी आनंदाने वास्तव्य करत आहेत. हायटेक टाऊनशिपच्या उत्कृष्ट सुविधांमुळे इथलं दैनंदिन जीवन सुखकर झालं आहे आणि मुलांचं संगोपन सुरक्षित, स्वच्छ व आनंदी वातावरणात होत आहे.

टाऊनशिपमध्ये मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी, तंदुरुस्तीसाठी जिम, सण-समारंभांसाठी कम्युनिटी हॉल आणि सभोवती हिरवळीने नटलेलं प्रसन्न वातावरण आहे. सण-उत्सव आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सर्व रहिवासी एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात. त्यामुळे इथे फक्त घरं नाहीत, तर एक आपुलकीचा, एकविचारी समाज उभा राहिला आहे जिथे
मुलं खेळत-बागडत मोठी होतात आणि ज्येष्ठ नागरिक निश्चित आयुष्य जगतात. KCC चं घर घेणं म्हणजे फक्त आश्वासन नाही, तर शेकडो कुटुंबांनी अनुभवलेलं वास्तव आहे.
प्रत्येक गरजेसाठी पर्याय. : लोटस ग्रीन, गीता नगर, अकोला 406 घरांची अत्याधुनिक सुविधायुक्त हायटेक टाऊनशिप. लोटस पार्क, MIDC-शिवणी, अकोला 448 घरांची अत्याधुनिक सुविधायुक्त हायटेक टाऊनशिप, लोटस हाइट्स, संत तुकाराम चौक, अकोला 2, 3 व 4 BHK आलिशान फ्लॅट्स आणि पेंटहाऊस. लोटस भारती, LIC ऑफिससमोर, टॉवर रोड, अकोला. व्यावसायिक गुंतवणुकीसाठी हायटेक बिझनेस पार्क,
गृहकर्ज आणि अनुदानाची सोय : घर घेताना आर्थिक नियोजनाची चिंता नको. KCC मार्फत आघाडीच्या बँका व वित्तसंस्थांकडून गृहकर्ज प्रक्रियेत संपूर्ण मार्गदर्शन व सहाय्य दिलं जातं. बाहेरगावी किंवा परदेशात राहणाऱ्या तरुणांनाही कागदपत्रांपासून नोंदणीपर्यंत सर्व प्रक्रिया सोप्या पद्धतीने पूर्ण करता येते आई-वडील येथे प्रत्यक्ष घर पाहू शकतात आणि मुलं दूर राहूनही निर्णय घेऊ शकतात. शिवाय, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1 BHK फ्लॅटसाठी ₹2.50 लाखांपर्यंत अनुदान (पात्रतेनुसार, नियम व अटी लागू).
घर म्हणजे आत्मसन्मान, स्थिरता आणि आनंद, घर म्हणजे गुंतवणुकीसाठी, आरोग्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी सुरक्षित पाया. जे तरुण बाहेर राहून मेहनत करत आहेत, त्यांच्या यशाचं सर्वात सुंदर प्रतीक म्हणजे आपल्या शहरात आई-वडिलांसाठी घेतलेलं हक्काचं घर.
या दिवाळीत… स्वप्नपूर्तीचा नवा शुभारंभ ! दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बुकिंग करा KCC सोबत. आजच साइटला भेट द्या, तयार घर प्रत्यक्ष पाहा आणि आपल्या कुटुंबासाठी योग्य पर्याय निवडा. पंकज कोठारीज् कोठारी कंस्ट्रक्शन कंपनी (KCC) -Living… to lifestyle कार्यालयः रामी हेरिटेज, जुन्या आर.टी.ओ.ऑफिससमोर, अकोला. संपर्क: 97649 99715 • 87674 09727.