Homeयंदा गणेश उत्पत्ती दर्शन ! नवीन संकल्पनेत श्री मारवाडी प्रेसचा गणेशोत्सव

यंदा गणेश उत्पत्ती दर्शन ! नवीन संकल्पनेत श्री मारवाडी प्रेसचा गणेशोत्सव

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : स्वातंत्र्य पुर्वकाळापासून सुरू केलेली परंपरा मागील ८९ वर्षांपासून कायम राखत यंदाही त्या परंपरेला अनुसरून सिद्धिविनायक गणेश यांच्यासह रिद्धि-सिद्धि व शुभ-लाभ यांची विलोभनीय मूर्ती स्थापित केली जाईल. निसर्गरम्य वातावरणात अष्टविनायक दर्शन, आदियोगी, श्री गणेश उत्पत्ती सचित्र दर्शन, महालक्ष्मी दर्शन, बाल गणेश-पार्वती दर्शन,सांवरिया सेठ दर्शन,नीम करोली बाबा दर्शन यांचा भव्य व दिव्य झाक्या साकारल्या जातील. ९० व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या श्री मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळातर्फे या वर्षी अनेक झाक्यांसह मानवीय व कल्याणकारी उपक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अनिल राठी व सचिव आर्कि.पवन बंग, माजी अध्यक्ष नितीन चांडक यांनी दिली.

गणेश भक्तांसह श्रध्दाळूंना सर्व झाक्यांचे अलौकिक दर्शन घेता यावे यासाठी चोख व्यवस्था केली गेली आहे.तसेच विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या वर्षी देखील मूर्तिकार सुरेश अंबेरे यांनी मुर्ती साकारली आहे.‌मंडप व सजावट बाबू बागडे, आणि परिसर सजावट व विघुत रोषणाई व साउंडही गाडगेबाबा यांची आहे.

उत्सवात सोमवार, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताश्री गणेश आगमन शोभायात्रा, सायंकाळी ७ वाजता श्री गणेश स्थापना
दररोज प्रातःकाळी ८ वाजता गणेश आरती, दररोज सायंकाळी ९ वाजता रागिनी संगीत विद्यालयाचे संचालक सतीश खोडवे यांच्या कडून संगीतमय महाआरती, सायंकाळी ९ वाजता पंडाल सजावट कलाकारांचा सत्कार, सकाळी ११:३० वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयात भोजन वाटप, १० दिवस (दर सोमवारी संपूर्ण वर्ष चालू) मंगळवार १५ सप्टेंबर रोजी प्रातःकाळी ९ वाजता मारवाडी प्रेस व सावतराम चाळ परिसरात साफसफाई मोहीम, बुधवार, १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री गीता पारायण, श्री गीता परिवार, अध्यक्षा कल्पना भूतडा, गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता गणपती अथर्वशीर्ष पाठ, अविनाश देशपांडे व मंडळ सदस्य, शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता, आदर्श गौसेवा संस्था, म्हैसपूर येथे गौसेवा, शनिवार, १९ सप्टेंबर रोजी प्रातःकाळी ९ वाजता निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राधाकिसन तोषणीवाल पब्लिक ट्रस्ट व दम्माणी नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने होणार आहे.

रविवार, २० सप्टेंबर सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबिर,स्व. डॉ. निकुंज अनूप कोठारी स्मृतीत डॉ. हेडगेवार रक्तपेढी व साईजीवन ब्लड बँक सहकार्याने सकाळी ९ वाजता आरोग्य तपासणी शिबिरात नामांकित डॉक्टर उपस्थित राहणार आहेत यात साखर, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड, हाडे, नसांची कमजोरी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी१२, हिमोग्लोबिन, यूरिक ॲसिड, कॅल्शियमची तपासणी केली जाणार आहे.

सोमवार २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता रामरक्षा स्तोत्र पठन पवन बंग करणार आहे.मंगळवार २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ९ वाजता सुंदरकांड भजन गायक राजेश सोमानी करणार आहे. सायंकाळी ४ वाजता भजन स्पर्धा (मंडळ सदस्यांसाठीच) बुधवार, २३ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता ५६ भोग दर्शन शैलेंद्र कागलीवालतर्फे होणार आहे. गुरुवार २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सत्यनारायण कथा, सायंकाळी मूर्तिकार, डेकोरेटर व संगीत कलाकारांचा सत्कार आणि शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी श्री विसर्जन शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी पार्किंग व्यवस्था कॉटन मार्केट,जनता बँक, दगडी पूल, नागपुरी जिन,जुना कापड बाजार येथे राहणार आहे. या उत्सवाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष अनिल राठी, सचिव पवन बंग, सहसचिव संजय मंत्री, उपाध्यक्ष मनोज लढ्ढा, उदय शाह, कोषाध्यक्ष संतोष राठी, लेखा परीक्षक प्रमोद मालपाणी, सहसचिव संजय मंत्री, उपाध्यक्ष मनोज लढ्ढा, उदय शाह, कोषाध्यक्ष संतोष राठी, अंकेक्षक प्रमोद मालपाणी,सल्लागार अनिल तापडिया, शरद चांडक, ब्रजेश तापडिया, शैलेन्द्र तिवारी, पंकज तापड़िया, आशीष राठी, नितिन चांडक, सचिन चांडक, भूपेंद्र तिवारी, केशव खटोड़, सुशांत राठी, अमित राठी, अमित भूतड़ा, लूणकरण मालाणी, अनिल बंग, शैलेन्द्र कागलीवाल, अरविंद अग्रवाल, गणेश मूंदड़ा, नीरज तापडिया, भरत तापडिया, संजय कलंत्री, नकुल सोनी, सदस्य कमलकिशोर तापडिया, जगमोहन तापडिया, मनमोहन तापडिया, विश्वनाथ शर्मा, नरेंद्र भाला, प्रशांत चांडक, गोविन्द लढ्ढा, जतिन राठी, अश्विन जाजू, सत्यम अग्रवाल, पराग शाह, चैलेश शाह, उदय शाह, दिवेश शाह, कल्पेश शाह, विजय शाह, प्रशांत शाह, अतुल मांडाणी, सुनील बंग, गोपाल लाहोटी, नंदकिशोर बाहेती, राधेश्याम चांडक, डॉ. संतोष सोमाणी, प्रमोद कचोलिया, विजय राठी जावरा, राम लढ्ढा, अलोक भूतडा, अनुराग कोठारी, अजय सारडा, सुनील बाहेती, प्रतिक भूतड़ा, संकेत चांडक, सुजल चांडक, पलक तिवारी, अक्षत सारडा, कृष्णा सारडा, विशाल सारडा, आशुतोष वर्मा, सागर हेडा, निशांत भन्साली, लोकेश टावरी, हितेश मुंधडा, राम बाणाईत, हिमांशु मानधने, लक्ष्य राठी, वंश खत्री,आयुष शर्मा, अद्वैत तापडिया, गौरव चांडक, आकाश बोदडे, प्रभु मोरे, विलास मोरे, सुहास पाटिल, विट्ठल महल्ले, राजेश खेडकर, निकुंज राठी, आकाश जैन, डॉ. रुपेश शाह, योगेश कलंत्री, गोपाल राठी, मधु भट्टड़, विजय मानधने, मुन्ना दुबे, गौरव रांदड, नारायण दुबे,राकेश दुबे,अनंत बोदडे सनी अग्रवाल, सौरभ भैय्या, राज शर्मा, नितिन जाजू, राजू तायड़े, दिलीप बोदड़े, आनंद चांडक तथा मंडळाच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular