Homeअकोल्यात बनावट कागदपत्रांनी प्लॉटची विक्री ! वृध्देची ५ कोटींनी फसवणूक

अकोल्यात बनावट कागदपत्रांनी प्लॉटची विक्री ! वृध्देची ५ कोटींनी फसवणूक

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अकोला शहराजवळील मलकापूर परिसरातील अंदाजे ५ कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या एका वृद्ध महिलेच्या मालकीच्या प्लॉटचे बनावट कुलमुखत्यारपत्र व कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या गंभीर प्रकारामुळे अकोल्याच्या महसूल आणि प्रॉपर्टी क्षेत्रात खळबळ उडाली असून, अलिकडच्या काळात अशा प्रकारच्या घटना वाढल्या आहेत. फसवणूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे.या प्रकरणामुळे मालमत्ता खरेदी-विक्री करताना कागदपत्रांची पूर्ण पडताळणी करणे किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

अकोला दिव्य छायाचित्र

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील जवाहर नगर, गोकुळ कॉलनी येथील रहिवासी व फिर्यादी शांता प्रकाश बाहेकर (वय ८४) यांच्या मालकीचा मलकापूर येथील सर्वे नंबर ८ मधील प्लॉट नं. २१, ज्याचं क्षेत्रफळ ५ हजार ७५ चौ. फूट आहे. या प्लॉटची अंदाजे किंमत ५ कोटी रुपये असून खोट्या दस्तऐवजांचा आणि बनावट कुलमुखत्यारपत्राचा (GPA) वापर करून प्लॉटची परस्पर विक्री करण्यात आली. बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करून आर्थिक फसवणूक करण्यात आली.असे तक्रारीत नमूद केले आहे.

पोलिसांनी तक्रारीची दखल घेत सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदरची माहिती देऊन तपास सुरू केला. संशयित आरोपींचा शोध घेणं असताना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन तासांत जुने शहरातील नायगाव येथील राहुल अशोकराव जाधव (४३), रिंग रोड येथील सरस्वती नगर रहिवासी प्रियांका लक्ष्मण पाटील उर्फ प्रियांका नागेश चव्हाण (३०) आणि मलकापूर येथील संतोष नगर येथे राहणारा आस्तिक श्रीकृष्ण चव्हाण (३०) या तिघांनाही संशयित म्हणून अटक केली.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी शांता बाहेकर यांच्या नावाने एका महिलेला सहभागी करून घेतले. उल्हासनगर व अकोला येथे बनावट कुलमुखत्यारपत्र तसेच खोटे खरेदीखताचे दस्तऐवज तयार करून सदर मालमत्तेची विक्री करण्यात आल्याचे सांगितले.पोलिस बनावट कागदपत्रे तयार करून देणा-याचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular