अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अकोला शहरातील संगीत रसिकांनी पहिल्यांदाच नवीन तंत्रज्ञानातील कराओके (karaoke),च्या माध्यमातून स्वर साथी कराओके ग्रुपकडून सादरीकरण करण्यात आलेल्या अत्यंत सुरेल मैफलीचा ‘एक सूरमयी शाम’ मधून जुने-नवीन हिंदी-मराठी चित्रपट गीते तसेच भजन-गझल गायनाचा मनसोक्त आनंद लुटला.

या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन आर.डी.जी कॉलेजच्या सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन प्रमुख पाहुणे आमदार वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते मॉं सरस्वतीच्या मूर्तीची पूजा आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले.याप्रसंगी अकोल्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुनील हातेकर उपस्थित होते. संचालक हरीश अण्णा यांनी आ. वसंत खंडेलवाल यांचा शाल, श्रीफळ आणि बुके देऊन सत्कार केला. तसेच सुनील हातेकर यांचा सत्कार वरिष्ठ सदस्य श्रद्धानंद बिहाडे यांनी केला. पाहुण्यांचा आगमनावर हरीश अण्णा यांनी ‘मेरे सरकार आये हैं…‘ गीत प्रस्तुत करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

स्वरसाथीचे संचालक हरीश अण्णा मिरजामले यांनी प्रभावी शैलीत गायलेल्या “म्हारा कीर्तन में रस बरसाओ…” या गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पुरुष व महिला गायकांनी त्यांच्यासोबत समूहगान केले. ‘एक सुरमयी शाम’ मध्ये 28 डुएट व 26 सोलो असे तब्बल 54 गीतांचा दमदार प्रस्तुतीने १४ महिला व २८ पुरुष गायकांनी संपूर्ण वातावरण भारून टाकले.कार्यक्रमाला अविस्मरणीय करण्यात स्वरसाथीचा सदस्याचे विशेष योगदान होते. महिला गायक म्हणून पुष्पलता काळे,रेखा मनवानी, वंदना साल्वे, पंचशीला इंगोले, पूजा मेहरे, वर्षा चंदन, प्रणिता पत्ती, लीना आर्या, सुनीता तोलानी, डॉ.वर्षा सुखदेवे, डॉ. रजनी चक्रे, स्वानंदी पांडे, रश्मी पाटिल व मेघा सुखदेवे यांचा सहभाग होता.

पुरुष गायक म्हणून हरीश अन्ना, मनोज गनकर, मधुकर मानकर, अप्पाजी अडगांवकर, राहुल शिरसाठ, अनिल पालवे, विजय वाकोडे, प्रशांत भारसाकळे, कृष्णा सुतार, नीलेश दोडके, श्रद्धानंद बिहाडे राजेश पूर्वे, विनोद पळसपगार, डॉ.अमोल शाह, विशाल मुरई, रवि संगेकर, राजेश सोनटक्के, सुधीर राठोड, रूपेश पत्ती, अतुल आखरे, संदीप दुबे, अमित गोसावी, राजेश घुगे,विजय लिखार, महेश मल्हार, नरेश बावने, महेश सुरेका, अनिल अवचार यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या समापन प्रसंगी हरीश अण्णाद्वारे प्रस्तुत समापन गीताने उपस्थित रसिक नृत्य करण्यापासून स्वतःला सांभाळू शकले नाहीत. पूजा मेहरे, डॉ.वर्षा सुखदेवे,वर्षा चंदन, डॉ.अमोल शाह आणि मधुकर मानकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वरसाथी व हरीश अण्णा यांचे आभार मानून कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रशंसा केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल शाह आणि आभार प्रदर्शन कराओकेचे वरिष्ठ सदस्य मनोज गनकर यांनी केले.
