अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्यातील सहकारी बँकींग क्षेत्रातील अग्रगण्य मल्टीस्टेट शेड्युल बँक अकोला अर्बन बँकेकडून सन २०२५-२६ करिता देखील भागधारकाना ६.७५ टक्के दराने लाभांश वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. बॅकेच्या अहवाल वर्षात ३ नवीन शाखा सुरू केल्या असून बँकचे कार्यक्षेत्र संपूर्ण गुजरात राज्यात वाढविण्यास रिझर्व्ह बँकेकडून परवानगी प्राप्त झाली आहे. अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष शंतनु जोशी यांनी बॅकेच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.

अकोला येथील बाजार समितीच्या ‘गायवाडा’ शेतकरी भवनात काल शुक्रवार १० जुलैला दुपारी मोठ्या संख्येने उपस्थित भागधारकांच्या साक्षिने संपन्न झालेल्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बॅंकेचे अध्यक्ष शंतनु जोशी यांनी आमसभेचे अध्यक्षस्थान स्विकारले व सभेच्या कामकाजास प्रारंभ करण्यात आल. .
सभेच्या प्रारंभी अहवाल वर्षात भारतातील थोर राजकीय नेते, संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, साहित्यिक, सैनिक, कलावंत, शिक्षण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, आर्थिक व सहकार क्षेत्रातील मान्यवर, महान विभूती तसेच अकोला अर्बन बँकेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक व कर्मचारी जे पंचतत्वात विलीन झाले. त्यांना सभेत भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बँकेचे अध्यक्ष शंतनु जोशी यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात भागधारकांचे स्वागत करून अहवाल वर्षात बँकेने केलेल्या प्रगतीचा आढावा सभेसमोर सादर केला.
बँकेचे वसुल भागभांडवल दि.३१.०३.२०२६ अखेर ७१.७३ कोटी आहे. राखीव व इतर निधी २२४.९६ कोटी आहेत. ठेवी १८९८.३१ कोटी असुन कर्ज वाटप ११२३.६४ कोटी तसेच निव्वळ नफा १४.१० कोटी आहे. बँकेच्या निव्वळ एन.पी.ए. चे प्रमाण ०.६१ टक्के आहे. सन २०२५-२६ करिता सुद्धा भागधारकाना ६.७५ टक्के दराने लाभांश वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. अहवाल वर्षात ३ नवीन शाखा सुरू केल्या आहेत. तसेच बँकचे कार्यक्षेत्र संपूर्ण गुजरात राज्यात वाढविण्यास रिझर्व्ह बँकेकडून परवानगी प्राप्त झाली आहे.

बँकेच्या सक्षम आर्थिक स्थितीबद्दल सभेत समाधान व्यक्त करण्यात आले.या प्रगतीमध्ये भागधारक, खातेदार, ठेवीदार व कर्मचारी या सर्वांचे सहकार्य आहे. व भविष्यातही असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा प्रास्ताविकातअध्यक्षांनी व्यक्त करून सभेस उपस्थित सर्व भागधारकांचे आभार व्यक्त केले.

मागील दि.१८.०६.२०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एम. सोनटक्के यांनी सादर केले. त्यास सभेने मान्यता कायम केली. यानंतर विषयसुचीनुसार विषय बँकेचे उपाध्यक्ष राहुल राठी, संचालक केदार खपली, धनंजय पाटील, किरण खोत, शार्दुल दिगंबर, राहुल गोयनका यांनी सभेसमोर सादर केले. त्या सर्व विषयांस उपस्थित सभासदांनी मान्यता दिली.

सभेचे संचालन बँकेचे संचालक दिपक मायी तर आभार प्रदर्शन संचालक माधव बनकर यांनी केले. सभेला संचालक अमरिकसिंग वासरीकर, प्रमोद शिंदे, अजय गांधी, मोहन अभ्यंकर, कैलाशनाथ मशानकर, संगीता गांधी, सीमा डिक्कर, तसेच बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य भूषण काळे, सुभाष गोरे, प्रसाद देशपांडे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राधेश्याम चिराणिया, कर्मचारी प्रतिनिधी पंजाब अव्हाळे बँकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

