BIRC आंतरराष्ट्रीय परिषदेत रुहटिया ग्रुपचे अध्यक्ष शिवप्रकाश रुहाटीया यांचा सहभाग ! केंद्रीय मंत्री पासवान यांची प्रमुख उपस्थिती

    0
    2

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : भारतातील तांदूळ निर्यात आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत अग्रगण्य स्थान मिळवून देण्यासाठी दिल्लीच्या भारत मंडपम येथे आयोजित भारत इंटरनॅशनल राइस कॉन्फरन्स (BIRC 2026) ही आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच दिल्ली येथे संपन्न झाली. या परिषदेत दिग्गजांच्या मांदियाळीत विशेष निमंत्रित म्हणून व्यासपीठावर अकोला येथील प्रसिद्ध उद्योग समूह ‘रुहटिया ग्रुप’चे अध्यक्ष शिवप्रकाश रुहाटीया उपस्थित होते. त्यांनी व्यासपीठावरून विदर्भ व महाराष्ट्रातील तांदूळ उत्पादक व प्रक्रिया उद्योगांच्या क्षमतांवर प्रकाश टाकला. त्यांच्या या उपस्थिती बद्दल अकोल्याच्या औद्योगिक क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे. ज्याने अकोला व महाराष्ट्राच्या उद्योग जगताची मान उंचावली आहे.

    या परिषदेचे आयोजन इंडियन राइस एक्सपोर्टर्स फेडरेशन (IREF) आणि ‘अपेडा’ (APEDA) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.या आंतरराष्ट्रीय परिषदेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये १५३ हून अधिक देशांतील सुमारे ४,८५६ आंतरराष्ट्रीय खरेदीदार (Buyers) आणि ३२ हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते.

    ही परिषद का आयोजित करण्यात आली ? : भारतामध्ये तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते, मात्र जागतिक बाजारपेठेत अधिक नफा मिळवण्यासाठी तांदळाचे ‘व्हॅल्यू ॲडिशन’ (मूल्यवर्धन), आधुनिक पॅकेजिंग आणि टिकाऊ शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावरील खरेदीदार (Buyers) आणि भारतातील निर्यातदार (Exporters) यांना एकाच छताखाली आणून व्यावसायिक भागीदारी (B2B बैठका) वाढवणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता.

    उद्योजक व देशाच्या उद्योग क्षेत्रासाठी याचे महत्त्व. : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आपल्या संबोधनात स्पष्ट केले की, “भारत उत्पादन क्षमतेत अव्वल आहे, पण आता आपल्याला उत्पादनाच्या गुणवत्तेवर (Quality) आणि मूल्यवर्धनावर (Value Addition) भर द्यावा लागेल”.

    • नव्या बाजारपेठांचा शोध: देशातील उद्योजकांना आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी थेट संपर्क साधून वर्ष २०२७ साठीच्या तांदूळ दरांचा अंदाज घेण्याची आणि करार करण्याची संधी मिळाली.
    • तंत्रज्ञान देवाणघेवाण: राइस मिलर्स आणि स्टार्टअप्ससाठी आधुनिक अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान (Food Processing Technology) समजून घेण्याचे हे मोठे माध्यम ठरले.

    आयोजक संस्था ‘IREF’ नेमके काय करते ? : या परिषदेचे मुख्य आयोजक इंडियन राइस एक्सपोर्टर्स फेडरेशन (IREF) ही भारतातील तांदूळ निर्यातदारांची सर्वोच्च राष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालय आणि अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या सहकार्याने काम करते. जगभरात भारतीय तांदळाचे मार्केटिंग करणे, निर्यातीमधील कायदेशीर व तांत्रिक अडचणी सोडवणे आणि भारतीय उद्योजकांना जागतिक व्यापार धोरणांची माहिती देणे, हे प्रमुख काम ही संस्था करते.

    उपस्थित प्रमुख पदाधिकारी: या तीन दिवसीय परिषदेत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यासह अन्न प्रक्रिया मंत्रालयाचे वरिष्ठ सचिव, ‘अपेडा’चे (APEDA) वरिष्ठ अधिकारी, जगभरातील कृषी शास्त्रज्ञ, ६५ हून अधिक तज्ज्ञ वक्ते आणि आयआरईएफचे (IREF) पदाधिकारी उपस्थित होते. या दिग्गजांच्या मांदियाळीत अकोल्याचे शिवप्रकाश रुहाटीया यांनी व्यासपीठावरून विदर्भ व महाराष्ट्रातील तांदूळ उत्पादक व प्रक्रिया उद्योगांच्या क्षमतांवर प्रकाश टाकला. त्यांच्या या उपस्थितीबद्दल अकोल्याच्या औद्योगिक क्षेत्रातून त्यांचे कौतुक होतं आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!