अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : आपल्या अकोला शहरातील व्यापारी व महिला उद्योजक यांच्यासोबतच साजरी करूया, या संकल्पनेला यंदा अधिक व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. अँड धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळाच्या पुढाकारातून ‘शुभारंभ’ प्रदर्शनीच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. जठारपेठ येथील रत्नम लॉन्स येथे उद्या शनिवार २४ आणि रविवार २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत, ही विशेष दिवाळी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात स्थानिक महिला उद्योजक व व्यावसायिक यांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादाने यंदा दिवाळीला हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महिलांच्या व्यवसाय स्वावलंबनाला चालना देण्यासाठी व अकोल्यातील नागरिकांना एकाच ठिकाणी दिवाळीची विविध प्रकारची खरेदी करता यावी, हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे.या प्रदर्शनामध्ये महिला उद्योजक, गृहउद्योग, स्थानिक व्यावसायिक आणि विविध वस्तूंच्या स्टॉल्सना ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. विशेष आकर्षण म्हणून बंपर लकी ड्रॉमध्ये पैठणी साडी, तसेच स्टॉलधारकांसाठी स्वतंत्र लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे.
अकोलेकरांनी खरेदीतून प्रोत्साहन द्यावे
महिलांनी केवळ घराच्या चौकटीत न राहता आपल्या कौशल्याला व्यवसायाची जोड देऊन स्वावलंबी व्हावे, यासाठी अशा प्रदर्शनांची भूमिका महत्त्वाची आहे. घरगुती खाद्यपदार्थ, कपडे, साड्या, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स, गिफ्ट आर्टिकल्स, सजावटीच्या वस्तूंसह विविध प्रकारच्या वस्तूंच्या माध्यमातून महिलांना आपल्या उत्पादनांची विक्री करण्याची संधी मिळत आहे.

दिवाळीची खरेदी स्थानिकांकडूनच का?
दिवाळीच्या काळात आपण मोठ्या प्रमाणात खरेदी करतो. हीच खरेदी जर अकोल्यातील व्यापारी, महिला उद्योजक आणि स्थानिक उत्पादकांकडून केली, तर त्याचा थेट फायदा आपल्या शहरातील कुटुंबांना होतो. स्थानिक व्यवसायाला चालना व महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळते.अकोल्याच्या बाजारपेठेत पैसा फिरतो. तेव्हा यंदाची दिवाळी ‘आपली दिवाळी–आपल्या अकोल्यातून’ साजरी करताना स्थानिक महिला उद्योजकांच्या उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अकोलेकरांनी गणेशोत्सवाप्रमाणेच दिवाळीतही स्थानिक महिला व व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. आपल्या शहरातील कष्टकरी महिला उद्योजकांच्या हाताला बाजारपेठ मिळाली, तर त्यांच्या आत्मविश्वासाला मोठी ताकद मिळेल, असे आवाहन अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी सोनाली व्हरसाळे 94221 11699
आणि परांजपे 99755 56178 या मोबाईलवर संपर्क साधावा.
