अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये होलिक्रॉस हायस्कूलची इयत्ता 5 वीची विद्यार्थिनी वेदिका श्रीकांत रत्नपारखी हिने गुणवत्ता यादीत जिल्ह्यातून ५२ वे स्थान पटकाविले केले आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पहिली पायरी म्हणून ही शिष्यवृत्ती परीक्षा गणल्या जाते. शिकवणी न लावता घरीच सातत्याने वर्षभर केलेला अभ्यास तसेच विविध स्पर्धा परिक्षांचा पुस्तकांचे वाचन आणि मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका संच सोडविल्यामुळे, आई-वडिल, शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळवू शकली असे वेदिकाने सांगितले.भविष्यात स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून प्रशासकीय अधिकारी होण्याचा मानस तिने यावेळी व्यक्त केला.या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच आप्तस्वकीयांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.
