Saturday, July 4, 2026
No menu items!
No menu items!
Homeहे खोटं नाही ! CA फाउंडेशन परिक्षेत M-Square Tutorials चा निकाल 75.75...

हे खोटं नाही ! CA फाउंडेशन परिक्षेत M-Square Tutorials चा निकाल 75.75 टक्के

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : द.इंस्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियाकडून मे २०२६ मध्ये घेतलेल्या सनदी लेखापाल पदवी अभ्यासक्रमाच्या सीए फाउंडेशन परिक्षेचा काल जाहीर करण्यात आलेल्या निकालात अकोला शहरातील M-Square Tutorials चा निकालाची टक्केवारी 75.75 टक्के आहे. पहिल्याच्या वर्षातील या निकालाने M-Square Tutorials वर्गाचा विलक्षण बुद्धिमत्तेची चुणूक आणि उत्कृष्ट परिणाम हे सर्व काही सांगणारा हा निकाल आहे.

CA Foundation परिक्षेचा या निकालात ICAI ची सरासरी उत्तीर्णांची टक्केवारी 20 टक्के असून एम स्क्वेअर ट्युटोरियल्सची उत्तीर्ण टक्केवारी ७५.७५ टक्के आहे. परिक्षेचा निकाल हा परीक्षा हॉलमध्ये तयार होत नाहीत. तर तो वर्गांमध्ये, दररोज एक एक करून तयार होतो. शिकवणी वर्गातील अचूक मार्गदर्शन हेच विद्यार्थ्यांचे यशाचे गमक आहे. असे संचालक मयंक थानवी यांनी सांगितले.

सीए फाउंडेशन परिक्षेत M-Square Tutorials चे ३३ विद्यार्थी हजर होते. त्यापैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महत्वाचे म्हणजे ३००+ क्लब मध्ये ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये इशिका बगडिया (336), नमित लधानी (326), देवांशी गावंडे (323), वेदांत मुंदडा (318), प्रज्वल घुघे (311), नंदिश वाकोडे (304), अथर्व नावकर (303) आणि जय रत्नपारखी (303) यांचा सहभाग आहे.

यासोबतच २५०+ गुण मिळवून आस्था कान्हेड (२९२), प्रित अग्रवाल (२८३),भूमी राजदेव (278),सर्वैश अग्रवाल (273),प्रीत विरमणी (268), निहाल शर्मा(254),माधव माहेश्वरी (248), प्रेम अग्रवाल (232),जिया चांदनानी (225), मिहिका धुरडे (220), महेक नवलरामानी (217) कैवल्य गहाले (214), अदिती जैन (208), दिशा जैन (208) यांनी घवघवीत यश संपादन केले आहे

अकोलाचे भविष्यातील सीए : इशिका बगाडिया, प्रित अग्रवाल, महेक नवलरामानी, नमित लधानी, भूमी राजदेव, कैवल्य गहाले, देवांशी गावंडे,सर्वोश अग्रवाल, अदिती जैन, वेदांत मुंदडा,प्रीत विरमणी,दिशा जैन, प्रज्वल घुघे, निहाल शर्मा, प्रज्वल डोळे,नंदिश वाकोडे,माधव माहेश्वरी,आदित्य कोकडेजा,अथर्व नावकर, प्रेम अग्रवाल, दिव्या कक्कर,जय रत्नपारखी,जिया चांदनानी,आस्था कान्हेड,मिहिका धुरडे यांचे सनदी लेखापाल होण्याचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास थानवी यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!