Sunday, May 17, 2026
No menu items!
No menu items!
Homeप्रा‌.देशमुख,भुईभार यांना जीवनगौरव पुरस्कार ! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचार मंथन मेळावा

प्रा‌.देशमुख,भुईभार यांना जीवनगौरव पुरस्कार ! लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचार मंथन मेळावा

अकोला दिव्य न्यूज : पत्रकार समाजाचा सेवक असून त्यांच्या माध्यमातून वर्तमान परिस्थितीची माहिती होऊन समाजात आवश्यक ती जागृती होते. शेतकऱ्यांकडे शासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे असून शेतकऱ्यांनीही स्वत:च्या प्रगतीकडे लक्ष म्हणून पेरण्यांची वेळ साधण्यासाठी पंढरपूरात आषाढीला न जाता कार्तिकेत जावे, दिवाळीत मुर्तीपुजेऐवजी घरातील गृहलक्ष्मीचेच पुजन करावे.असे प्रतिपादन समाजप्रबोधक,कृषी किर्तनकार महादेवराव भुईभार यांनी केले.

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ४२ व्या विचार मंथन मेळाव्यात ते अध्यक्षिय भाषणातून बोलत होते.परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी समाजसेवक आणि पत्रकारांनी संघटीत होण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. याप्रसंगी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे महाराजांना अभिवादन करण्यात आले. देशातील शहिद,अत्याचारग्रस्त भगिनी, कुंभमेळ्यातील बळी, दिवंगत पत्रकार,आत्महत्त्याग्रस्त शेतकरी, आपत्ती व अपघातातील बळींना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी प्रा‌.राजाभाऊ देशमुख व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी सुरेश तिडके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी महादेवराव भुईभार व प्रा.राजाभाऊ देशमुख यांना लोकस्वातंत्र्य सामाजिक जीवन गौरव या राज्यस्तरीय पुरस्काराने तर प्रशासकीय आणि सामाजिक सेवेबद्दल सुरेश तिडके यांना स्मृतीचिन्हाने सन्मानित करण्यात आले. पत्रकार महासंघाची मोतीबिंदू शिबीरे व सामाजिक उपक्रमात नेहमी सहयोग देणाऱ्या निंबा येथील गणेश देशमुख,अमोल देशमुख,दिपक मास्कर, विनायक आंबुसकर, रामदास हिवसे, वासुदेव बावणे अशा २२ स्वयंसेवकांना प्रोत्साहनपर स्मृतीचिन्ह व पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अमरावती जिल्हा आणि चांदुरबाजार व अचलपूर तालूक्यातील पदाधिकाऱ्यांची संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व अमरावती जिल्हाध्यक्ष संजय गावंडगांवकर आणि अतिथींच्या उपस्थितीत ओळखपत्र व नियुक्तीपत्र देऊन स्वागतं करण्यात आले.

यावेळी लोकस्वातंत्र्य संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, उपाध्यक्ष प्रदिप खाडे,सचिव राजेन्द्र देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात संजय देशमुख यांनी प्रशासनाचा अनागोंदी, भ्रष्ट आणि संवैधानिक प्रतारणेचा समाचार घेऊन जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात सिव्हील लाईन पोलिसांनी कसूर करून सोनल अग्रवाल यांचावर केलेल्या अन्यायाची माहिती दिली. अशा प्रकाराविरूध्द पत्रकार आणि समाजसेवकांनी आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा.महादेव लुले यांनी केले. यावेळी प्रा.डॉ संतोष हुशे,अँड.राजेश जाधव, सिध्देश्वर देशमुख, डॉ.शंकरराव सांगळे, डॉ.विनय दांदळे, माणिकराव कांबळे, संदिप देशमुख, के‌.व्ही.देशमुख,अंबादास तल्हार, अमरावती जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, अकोला जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सागर लोडम, सामाजिक सेवा संघ अध्यक्ष संजय देशमुख, कंझारेकर, मनोहर मोहोड, दिलीप नवले, विजय सु.देशमुख, रमेश समुद्रे, वसंतराव देशमुख, सी‌.ए.तुषार तल्हार, प्रतिक्षा तल्हार, धारेराव देशमुख, शामराव देशमुख, गौरव देशमुख, उल्हास मोकळकर, डॉ ‌अशोक सिरसाट, अशोककुमार पंड्या, फुलचंद वानखडे, अनंतराव देशमुख, अर्जून घुगे, के‌.एम‌.देशमुख, योगेश सिरसाट, रविन्द्र देशमुख, शिवचरण डोंगरे, दिपक सिरसाट, अनंत महल्ले, प्रशांत देशमुख, सतिश देशमुख (विश्वप्रभात) ,प्रा.सुरेश मोरे, देवराव सिरसाट, गजानन चव्हाण, संतोषकुमार गवई, संघपाल सिरसाट, सोनल अग्रवाल, शांताराम धोत्रे, रविन्द्र देशमुख, पांडूरंग आगळे, पी.एन.जामोदे, अमरावती येथील किशोर वानखडे, उमेश वानखडे, गजानन कावरे, गणेश थोटांगे,गजानन ढवळे, शंकरराव मानापूरे, सुनिल तळोकार, संजय सरवटकर,नानासाहेब धुळे (अमरावती) दिलीपराव देशमुख,गणेश देशमुख,दिपक मास्कर, अमोल देशमुख,वासुदेव बावणे, विनायक आंबुसकर,रामदास हिवसे (निंबा) व इतर पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आभारप्रदर्शन राजेन्द्र देशमुख यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!