Homeखामगावचे डॉ. सोनी यांचा खून की...? आज PM रिपोर्ट मिळणार

खामगावचे डॉ. सोनी यांचा खून की…? आज PM रिपोर्ट मिळणार

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : खामगाव शहरातील ख्यातनाम ‘पॅथॉलॉजिस्ट’ आणि शहरातील एकमेव असलेल्या ‘सोनी रक्तपेढी’चे संचालक डॉक्टर गोपाल सोनी यांचा मृतदेह आढळून आल्याने दोन दिवसांपासून शहरात चर्चेला उधाण आले आहे. घटनेच्या दिवशी डॉक्टर सोनी यांच्या सोबत गेलेल्या तीन जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे.आज मंगळवार १४ जुलैला शवविच्छेदन येण्याची शक्यता असून, यानंतर डॉ.सोनी यांचा अपघात, घातपात की…मृत्यूचे कारण उघडकीस येईल.

डॉ सोनी यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्यांच्या शरीरावर कथितरित्या जखमांच्या खुणा आढळून आल्याने हा घातपाताचा प्रकार असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खामगाव ग्रामीण पोलिसांनी तपास चक्र फिरवत रविवारी रात्री उशिरा ३ संशयितांची चौकशी केली.

सोनी हे मागील अनेक वर्षांपासून खामगाव येथे रक्तपेढी चालवत होते. रविवार सुट्टीचा दिवसअसल्याने ते सायंकाळी एकटेच त्यांच्या शेतात गेले होते. मात्र, तिथे गेल्यानंतर दीड ते दोन तासांतच शेतात मृतावस्थेत आढळून आले. सोनी यांच्या भावाच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेऊन तपासाला गती दिली आहे.

दरम्यान, डॉ. सोनी यांच्या मृतदेहाचे सोमवारी विच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘फॉरेन्सिक टीम’ला पाचारण करण्यात आले होते. तीन तज्ज्ञांचा समावेश असलेल्या या चमूने विच्छेदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular