Homeउद्योजक मधुर सुनील इन्नाणी यांचा 'शिवगौरव' युवा उद्योजक पुरस्काराने सन्मान

उद्योजक मधुर सुनील इन्नाणी यांचा ‘शिवगौरव’ युवा उद्योजक पुरस्काराने सन्मान

अकोला दिव्य न्यूज : शहरातील बांधकाम क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप पाडून ‘यमुना टॉवर 2’ हा गृहनिर्माण प्रकल्प यशस्वी केला. उद्योजक युवकांसाठी पथदर्शी ठरलेले युवा बांधकाम उद्योजक मधुर सुनील इन्नाणी यांचा या कार्याची दखल घेऊन नुकतेच ‘शिवगौरव’ युवा उद्योजक पुरस्कार प्रदान करुन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

अकोला शहरातील बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी आणि राजीविन सोलर यांच्या संयुक्त विद्यमाने आर.एल.टी.विज्ञान महाविद्यालयांच्या सभागृहात आयोजित ‘औषधाविना आरोग्य’ या कार्यक्रमात राष्ट्रीय पारितोषिक विजेता व ख्यातनाम निसर्गोपचार तज्ञ व व्याख्याता स्वागत तोडकर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

अकोल्यातील रियल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रातील मार्वल ट्रिनिटी रियल इस्टेटचे भागीदार, प्रसिद्ध बांधकाम व्यवसायी सुनील इन्नाणी यांचे मधुर इन्नाणी सुपुत्र आहेत. त्यांनी बांधकाम क्षेत्रात अल्पावधीत वाखाण्याजोगे कार्य केले असून, गौरक्षण रोडवरील सहकार नगर भागातील दत्त कॉलनी येथे यमुना टॉवर 2 हा निर्माणाधीन प्रकल्प १०० टक्के यशस्वी केला आहे.

प्राथमिक शिक्षण अकोला येथून पुर्ण झाल्यानंतर मुंबई येथील हिंदूजा कॉलेजमधून पत्रकारिता (journalism) अभ्यासक्रमात पदवी प्राप्त मधुर इन्नानी यांनी आपले वडील सुनील इन्नानी यांच्यासमवेत बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली. या क्षेत्रातील जुजबी माहिती आणि अनुभव मिळवून घेतला. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी यमुना टॉवर 2 हा प्रकल्प प्रारंभ केला आहे. काटेकोर नियोजन करून सुरू केलेला हा प्रकल्प ग्राहकाच्या पसंतीस खरा उतरला आहे. आता हा प्रकल्प पुर्णत्वास येत असून त्यांच्या कार्याची दखल घेत बहाल करण्यात आलेल्या या पुरस्कारासाठी त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular