अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : पश्चिम विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगानगर येथील श्री सालासर बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी देव दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दीपमाळांची रोषणाई, आकर्षक देखावे व भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण मंदिर परिसर पुन्हा एकदा भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे.

पश्चिम विदर्भातील अकोला शहरातील गंगा नगर येथील परिसरात जवळपास २ लाख चौरस फूट जागेत नयनरम्य बगीच्याचा मनोहर वातावरणात वर्ष २०२४ मध्ये सालासर मंदिराची स्थापना झाली. येथे सालासर हनुमान, राम दरबार, राधाकृष्ण आणि शिव परिवार यांची मूर्ती आहेत. अकोला शहरातील धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक वैभव आहे.
उत्सवांची परंपरा: या मंदिरात रामनवमी, जन्माष्टमी आणि हनुमान जयंती यांसारखे प्रमुख सण मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात.
मोहक देखावे व झांकी: प्रत्येक उत्सवानिमित्त सादर होणारे आकर्षक देखावे, झांकी आणि चलचित्र भाविकांचे लक्ष वेधून घेतात आणि मनाला भुरळ घालतात.
- भाविकांची अलोट गर्दी: प्रत्येक उत्सवावेळी मंदिर आणि परिसरात भाविकांची मोठी गर्दी होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने फुलून जातो.
सामाजिक सलोखा आणि एकात्मता : देव दिवाळीच्या निमित्ताने होणाऱ्या या दीपोत्सवामुळे केवळ धार्मिक परंपरा जपली जात नाही, तर समाजात सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि एकोप्याचा संदेशही दिला जातो. विविध स्तरांतील भाविक एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत असल्याने सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो. मंदिर व परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन योग्य नियोजन केले जाते.