• औद्योगिक समस्यांच्या निराकारणास्तव पाठपुरावा -खा खंडेलवाल
• विदर्भ चेंबरची 92 वी वार्षिक आमसभा उत्साहात सम्पन्न
अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : भारतीय घटना समितीचे सभासद आणि जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी ब्रिजलाल बियाणी यांनी इंग्रजांच्या काळात भविष्याचा वेध घेऊन, व्यवसाय आणि औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी स्थापन केलेल्या विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेच्या अध्यक्षपदी निरव वोरा तर सचिव पदावर निलेश अग्रवाल यांची अविरोध निवड करण्यात आली.

आज रविवार २८ जून २०२६ रोजी दोन सत्रात संपन्न झालेल्या आमसभेच्या सकाळी झालेल्या प्रथम सत्रात मागील आमसभेचे कार्य वृत्तांत किरीट मंत्री यांनी वाचून दाखविला. तसेच स्थिती विवरण प्रस्तुत करण्यात येऊन 2026 -27 चा अर्थसंकल्प कोषाध्यक्ष किशोर बाछुका यांनी सादर केला. यानंतर निवडणूक अधिकारी रमाकांत खंडेलवाल यांच्याद्वारे वर्ष 2026- 28 या दोन वर्षासाठी नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी निरव वोरा, वरिष्ठ उपाध्यक्षपदी सिद्धार्थ रुहाटीया, कनिष्ठ उपाध्यक्ष किशोर बाछुका, सचिव निलेश अग्रवाल, कोषाध्यक्ष म्हणून श्रीकांत गोयनका आणि सहसचिवपदी संतोष छाजेड यांची निर्विरोध निवड करण्यात आली.
द्वितीय सत्रात सर्व प्रथम स्व ब्रजलाल बियाणी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रजवलनाने या सत्राची सुरुवात करण्यात आली. चेंबरचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेत झालेल्या वार्षिक आमसभेत खासदार व राष्ट्रातील सर्वोच्च व्यापारी संघटना असणाऱ्या कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार प्रवीण खंडेलवाल, कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी.भरतीया, खा अनुप धोत्रे उपस्थित होते. यावेळी मंचावर चेंबरचे मानद सचिव निरव वोरा, निवर्तमान अध्यक्ष नितीन खंडेलवाल,वरिष्ठ उपाध्यक्ष सिद्धार्थ रुहाटीया, कनिष्ठ उपाध्यक्ष निखिल अग्रवाल, कोषाध्यक्ष किशोर बाछुका, सहसचिव किरीट मंत्री आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध संस्था व संघटनांनी खासदार प्रवीण खंडेलवाल व भरतीया यांचे स्वागत केले. यावेळी उद्योजक व व्यापाऱ्यांचा अवार्ड कार्यक्रम विविध श्रेणीत संपन्न झाला.
सर्वप्रथम जेष्ठ उद्योजक चेंबरचे पूर्वाध्यक्ष श्रीकिसन अग्रवाल यांना चेंबर रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर व्हीसीसीआय अवॉर्ड बेस्ट कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये प्रा मुकुंद पाध्ये यांना स्व गुलाबचंद गुप्ता यांच्या स्मृतीत शाल,मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले. बेस्ट फॅमिली प्रॅक्टिस बिजनेस श्रेणीत लेबेन लेबोरेटरीचे संचालक भरत नितिलाल शाह यांना स्व कालुराम रुहाटीया यांच्या स्मृतीत सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट महिला उदयमी श्रेणीत बाणा टेक्सटाईलच्या संचालिका सौ अलका अजय सेंगर यांना स्व विमलादेवी गोयनका यांच्या स्मृतीत सन्मानित करण्यात आले.युवा उद्यमी पुरस्कार या श्रेणीत दास मोबाईलचे युवा संचालक रितेश मिर्जापुरे यांना स्व सुभाष नाथालाल चंदाराणा यांच्या स्मृतीत सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट कार्यकारिणी सदस्य पुरस्कार गुलशन कृपलानी यांना गंगासहाय परिवारातर्फे व उत्कृष्ट उपसमिती सदस्य पुरस्कार प्रणव कोठारी यांना सोहनलाल गणेशलाल बिलाला यांच्यातर्फे प्रदान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार प्रवीण खंडेलवाल, कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतीया खा अनुप धोत्रे यांनी आपले विचार व्यक्त करीत नूतन कार्यकारणी व विदर्भ चेंबरच्या शतकोत्तर वाटचालीस आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात. प्रास्ताविक विदर्भ चेंबरचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांनी करून चेंबरच्या विविध उपक्रमांची जाणीव करून देत गत चार वर्षांत सर्वांनी सहकार्य करून चेंबरच्या विकासाचा हा आलेख उंच केला याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमात चेंबरच्या व्यापार बुलेटींचे बुलेटिन समिती सदस्य संतोष छाजेड, राहुल मित्तल, मनोज अग्रवाल,अँड सुरेश अग्रवाल गुरुजी, प्रा विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
मान्यवरांचे स्वागत चेंबरचे माजी अध्यक्ष अशोक दालमिया, वसंत बाछुका, विजय पनपालिया, राजकुमार बिलाला, नितीन खंडेलवाल,रमाकांत खंडेलवाल आदींनी केले.संचालन चेंबरचे सचिव निरव वोरा व मधुर खंडेलवाल यांनी तर आभार निलेश अग्रवाल यांनी मानलेत. राष्ट्रगीत व स्नेहभोजनाने या कार्यक्रमाचे समापन करण्यात आले. आमसभेच्या सफलतेसाठी राहुल गोयनका, अँड. सुभाषसिह ठाकूर, दिलीप खत्री, मनीष केडिया, राजकुमार राजपाल, चंचल भाटी, सजन अग्रवाल,शांतीलाल भाला, योगेश अग्रवाल, राजीव शर्मा, नमन खंडेलवाल, पंकज कोठारी, आशुतोष वर्मा, दिपाली देशपांडे, रजनी महल्ले, हरीश लाखानी,कमल खंडेलवाल, सलीम डोडिया, कृष्णा शर्मा, महेश मुंदडा, राहुल मित्तल, रुपेश राठी, आशिस अमिन , केतन गुप्ता, राहुल गोसर, पियुष खंडेलवाल समवेत चेंबरच्या बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
