Monday, June 29, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोला : संदीप अशोक तोष्णीवाल यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी प्रदान

अकोला : संदीप अशोक तोष्णीवाल यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी प्रदान

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : दिवसागणिक घरगुती इंधनाचा वाढता तुटवडा भासू लागल्याने काळाची गरज ओळखून यासाठी पर्याय असलेल्या आणि नाममात्र खर्चात तयार होणाऱ्या ‘बायोगॅस’ उत्पादनासाठी परिणामकारक अभ्यास करून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडे सादर केलेल्या शोध प्रबंधावर संदिप अशोक तोष्णीवाल यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. तोष्णीवाल कुटुंबांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत संदिप अशोक तोष्णीवाल यांनी अकोल्यातील युवा पिढीला प्रेरणा दिली आहे.

सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञानमधून‌ बायोगॅस उत्पादनावरील अभ्यास या शिर्षकाने संदिप तोष्णीवाल यांनी घरातील सेंद्रिय स्वयंपाकघरातील कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा एक कार्यक्षम मार्ग, या विषयावर प्रात्यक्षिक करून आपला शोध प्रबंध संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे सादर केला होता. तद्पुर्वी याविषयीची नोंदणी केली. शोध प्रबंधासाठी संदीप तोष्णीवाल यांना पर्यवेक्षक म्हणून अकोला येथील आर.एल.टी विज्ञान कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. विजय नानोटी यांचे मार्गदर्शन लाभले.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाने कुलगुरूंनी दिलेल्या निर्देशानुसार प्रबंधाच्या मूल्यांकनासाठी संदीप अशोक तोष्नीवाल यांनी पीएच.डी. पदवीसाठी सादर केलेल्या प्रबंधाचे मूल्यांकन करून परीक्षकांनी आपला अहवाल सादर केला. विद्यापीठाने त्यांचा अहवाल स्वीकारून संदीप तोष्नीवाल यांना विद्याशाखेत डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यास पात्र असल्याचे जाहीर केले.

माहेश्वरी समाजातील नामवंत अशोक टेलर या नावाने ओळखले जाणारे अशोक तोष्णीवाल यांचा संदिप जेष्ठ पुत्र असून आपल्या यशात वडिल आणि आई छाया तोष्णीवाल, पत्नी दिक्षा तोष्णीवाल यांचा सिंहाचा वाटा आहे. असे संदिप यांनी सांगितले. आपल्या स्वयंपाकघरातील सेंद्रिय कचऱ्याचा पुनर्वापर करून निर्माण होणाऱ्या ‘बायोगॅस’ मुळे किमान ४० टक्के एलपीजी गॅसची बचत होते.हे प्रयोगात सिध्द झाले. बायोगॅस तयार झाल्यानंतर शिल्लक राहलेला घटक पदार्थ हा उत्कृष्ट दर्जाचे सेंद्रीय खत म्हणून घरातील झाडांना अत्यंत पोषक आहे. असं संदिप तोष्णीवाल यांनी सांगितले.

एका शानदार सोहळ्यात त्यांना पदवी बहाल करण्यात आली. यावेळी बीजाई सोसायटीचे पदाधिकारी व महाविद्यालये प्राचार्य आणि प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!