सिध्दार्थ रुहाटिया यांचा कन्झुमर प्राॅडक्टस डिस्टीॢब्युटर्स असोसिएशनतर्फे सत्कार

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व ॲग्रिकल्चर या संस्थेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल विठ्ठल ऑईलचे संचालक सिध्दार्थ रुहाटिया यांचा अकोला कन्झुमर प्राॅडक्टस डिस्टीॢब्युटर्स असोसिएशनतर्फे शाम अग्रवाल प्रदिप बियाणी,राजेंद्र पातुरकर व शर्मा यांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज व ॲग्रिकल्चरकडून सिध्दार्थ रुहाटिया यांच्या माध्यमातून आपल्या व्यवसायिक अडीअडचणीचे निवारण करुन घेऊ शकतो.तसेच अन्न व औषधी प्रशासनाचे‌ आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीने आपल्या समोर काही आव्हान निर्माण झाले आहेत. जसे माल विकतांना परवान्यांचे नूतनीकरण झाले आहे की नाही याची जबाबदारी परवानाधारकावर टाकली‌ आहे. प्रत्येक फुड‌ व्यवसायातील कामगार व कर्मचारी यांचे मेडिकल सर्टिफिकेट बंधनकारक आहे.या अनुषंगाने या आणि इतर मुद्द्यावर चर्चा झाली.

महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन रुहाटिया यांनी दिले. यावेळी रूहाटिया ग्रुपचे मुख्य व्यवस्थापक राम पाटील तसेच अकोला कन्झुमर प्राॅडक्टस डिस्टीॢब्युटर्स असोसिएशन सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here