अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या 32 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत विद्यार्थी, दीर्घ मुदतीचे ठेवीदार, तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

पाटील समाज महिला मंडळाच्या सचिव अँड दिपाली जानोरकर यांचाही सत्कार करण्यात आला. अँड दिपाली यांनी ” कौटुंबिक वादविवाद समेट केंद्र ” तयार केले असून अनेकांना त्यांनी मोफत कायदेशीर सल्ला देऊन त्यांचे वाद मिटविले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा हा गौरव करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मुरूमकार होते. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किरण सरनाईक, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, बेरार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अँड मोतीसिंह मोहता, अकोला अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, सुमित्राबाई कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष कृष्णा अंधारे, नगरसेवक आशिष पवित्रकार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रशेखर पांडे उपस्थित होते.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर नळकांडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. त्यास सर्वांनुमते मंजुरी देण्यात आली. तसेच 2025-26 या आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा, वार्षिक अहवाल, आगामी नियोजनाची माहिती सभासदांना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत पिंजरकर तर आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत फाटे यांनी केले.
सभा व कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता जगदीश मुरुमकर यांचासह संचालक मंडळाने परिश्रम घेतले. कार्यक्रमास सदस्य व गणमान्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
