अभिमानास्पद…! आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अकोल्याचे दिग्विजयसिंह राजपूत यांचा सहभाग

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : कॅलिफोर्नियातील जागतिक मंचावर मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय महोत्सवात अकोला शहराचे सुपुत्र व हरहुन्नरी चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचे दिग्विजयसिंह राजपूत यांना सन्माननीय सहभाग देण्यात आला. निश्चितच हे त्यांच वैयक्तिक यश असले तरी अकोलेकर व पंचक्रोशीतील लोकांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब म्हटले तर गैर होणार नाही.

सॅन होजे येथील ऐतिहासिक कॅलिफोर्नियातील सभागृहात उत्तर अमेरिकन चित्रपट असोसिएशनतर्फे (NAFA) आयोजित प्रतिष्ठीत मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 सोहळा उत्साहात पार पडत आहे. काल शनिवार ८ ऑगस्टला रेड कार्पेट सोहळ्यात अकोल्याचे सुपुत्र आणि EB-5 नवीन अभ्यासक्रम इंटरिअराइझेसचे अध्यक्ष दिग्विजयसिंह यांना विजेत्यांची नावे घोषित करण्याचा मान मिळाला. या प्रसंगी सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे देखील सहभागी होते.

त्यानंतर चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार व मान्यवरांसोबत स्नेहभोजनासाठी EB-5 नवीन अभ्यासक्रम इंटरिअराइझेसचे अध्यक्ष दिग्विजय सिंह राजपूत यांना निमंत्रित करण्यात आले होते.यामध्ये महेश कोठारे, रोहिणी हट्टांगडी, नागराज मंजुळे, श्रुती मराठे यासारख्या नामवंत कलाकारांसोबत दिलखुलास गप्पा गोष्टी करत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

अमेरिकेतील जागतिक दर्जाच्या व्यासपीठावरील या महोत्सवाला अनेक प्रतिष्ठित संस्थांचे प्रायोजकत्व लाभले असून, त्यामध्ये New Course Enterprises ही कंपनी प्रमुख प्रायोजकांपैकी एक आहे. ही कंपनी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट, कन्स्ट्रक्शन, कॅपिटल मॅनेजमेंट तसेच EB-5 गुंतवणूक वीजा कार्यक्रम या क्षेत्रात कार्यरत आहे. EB-5 प्रेसिडेंट या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी राजपूत यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे,ही देखील अभिमानाची बाब आहे.

अकोला शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत प्रा. प्रदीप राजपूत आणि सन्मित्र पब्लिक स्कूलच्या प्राचार्य मनिषा राजपूत यांचा दिग्विजयसिंह जेष्ठ पुत्र आहेत.या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून दिग्विजयसिंहचे अभिनंदन केले जात आहे.भविष्यातही अशीच उत्तुंग भरारी घेत आपल्या अकोला शहराचे व देशाचे नाव उज्वल करत रहा,अशा शब्दात मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here