‘गोवर्धन’ शुध्द देशी तुपात भेसळ ? तब्बल 2 कोटीचे तूप जप्त ; ‘गोपिश्री’ ब्रँडच्या तुपाचे चार नमुने जप्त

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : गाईच्या दुधापासून तयार करण्यात आलेले, दाणेदार आणि पौष्टिक शुद्ध देसी गोवर्धन तूप अशी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याकडून जाहिरात करणाऱ्या आणि महाराष्ट्रातील पुणे येथील पराग मिल्क फुड लिमिटेड चे ‘गोवर्धन’ या नावाने विकले जात असलेले सुमारे ३०,००० लिटर तुपाचा विक्रीवर तात्काळ बंदी घातली आहे. जप्त केलेल्या या साठ्याचे मूल्य अंदाजे २ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.शासन आणि प्रशासन यांच्या आशीर्वादाने अलिकडच्या काळात खाद्य पदार्थात राजरोसपणे भेसक करून सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी खेळ सुरु आहे.या छाप्याने आता काय खावं असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. भेसळीचा वाढत्या प्रमाणामुळे कर्करोग (कॅन्सर) रूग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे.

मध्यप्रदेश अन्न सुरक्षा विभागाने भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधात एका विशेष मोहिमे सुरू केली आहे. या अंतर्गत इंदूर अन्न सुरक्षा विभागाने इंदूरमध्ये ‘गोवर्धन’ ब्रँडच्या जवळपास ३०,००० लिटर तुपाच्या विक्रीवर तात्काळ बंदी घातली आहे. विशेष म्हणजे संस्थेकडे केंद्रीय परवाना नसल्यामुळे, ही माहिती तात्काळ एफएसएसएआयच्या पश्चिम विभागाला कळवण्यात आली. केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी विविध पॅकेजिंगमधून २० नमुने गोळा केले सुरक्षा पथकाने तुपाचे २० नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, अहवाल प्राप्त होईपर्यंत या संपूर्ण साठ्याच्या विक्रीवर बंदी कायम राहील.

यासोबतच मध्यप्रदेश मधील रीवा जिल्ह्यातील गुंड रोड बंदराव येथील D-Mart मधून देखील आरोग्यासाठी असुरक्षित असलेल्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात गोवर्धन देशी तूप जप्त केले आहे. याअंतर्गत गोवर्धन तूपाचे वितरण करणारी साखळीच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी या तुपाची विक्री केली जाते. त्या ठिकाणांहून गोवर्धन तूपाची नमूना (सॅम्पल) घेऊन, विक्री प्रतिबंधीत केली जाणार आहे.अशी माहिती एफ.एस.ओ अमरीश दुबे यांनी दिली.

केंद्रीय पथकाने सरळ पराग मिल्क फूड्स डेपोवर छापा टाकला. खरं तर, अन्न सुरक्षा आयुक्तांच्या निर्देशानुसार, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी राज्यभरात एक विशेष मोहीम राबवली जात आहे. याच संदर्भात, इंदूरचे जिल्हाधिकारी शिवम वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा प्रशासनाच्या पथकाने एबी रोडवरील ‘पराग मिल्क फूड्स लिमिटेड’च्या डेपोची तपासणी केली. हा डेपो संपूर्ण मध्य प्रदेशात ‘गोवर्धन’ ब्रँडच्या तुपाचा पुरवठा करतो.

गोपिश्री’ ब्रँडचे तूपही जप्त. या कारवाईदरम्यान, अन्न अधिकाऱ्यांनी भावन्या एंटरप्रायझेसवर छापा टाकून ‘गोपिश्री’ ब्रँडच्या तुपाचे चार नमुने जप्त केले. अहवाल येईपर्यंत अंदाजे ३१२ लिटर तूप (अंदाजे १.३४ लाख रुपये किमतीचे) जप्त करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here