Homeअकोल्याचे 78 वर्षीय डॉक्टराचा जंतरमंतर येथील आंदोलनात सक्रिय सहभाग

अकोल्याचे 78 वर्षीय डॉक्टराचा जंतरमंतर येथील आंदोलनात सक्रिय सहभाग

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : नीट पेपरफुटी नंतर देशभरात प्रचंड अस्वस्थता व असंतोष पसरला असून, केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा आणि इतर मागण्यांसाठी दिल्ली येथील जंतरमंतर येथे देशभरातून लाखोंच्या संख्येने उपस्थित झालेल्या युवक युवतीसह काढण्यात आलेल्या मोर्चात चक्क अकोला येथील एक ७८ वर्षीय डॉक्टर सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या मोर्चात काही अघटीत घडले आणि आपण मेलो तर चिंता करायची नाही, असं कुटुंबाला स्पष्ट सांगून आलो आहे.

इंस्टाग्राम वरून

भावी पिढीच्या भवितव्याचा विचार करून, त्यांना समर्थन आणि पाठिंबा देण्यासाठीच सहभागी झाले, असं या ७८ वर्षीय तरूण डॉक्टराने एकाने विचारले असता सांगितले. वैद्यकीय शिक्षणातील M.B.B.S. पदवीधर असलेले आणि वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले. या जिगरबाज डॉक्टरांचा एक मुलगा आर्किटेक्ट आणि एक मुलगा इंजिनिअर आहे. मुलांनी रेल्वेचे वातानुकूलित श्रेणीचे येण्या-जाण्याचे टिकीट काढून दिले आहे. सत्यासाठी असलेल्या हा लढा बघणे आणि निरर्थक बडबड वा चर्चा करून मार्ग निघू शकत नाही. सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे. असे त्यांनी सांगितले. मुलाखत घेणाऱ्याने त्यांच नाव विचारले नाही. जगात सत्याला साथ देणारे असे लोक आसल्याने परिस्थिती हाताबाहेर जात नाही. डॉक्टर तुम्हाला मानाचा मुजरा !

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular