अकोल्याच्या परिधी तायडे हिला राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत परिधी तायडे हिने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावून अकोला जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अकोला येथील D.A.V कॉन्व्हेंटची विद्यार्थी असलेल्या परिधी तायडे हिने पटकाविलेल्या कांस्यपदकासाठी तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आयोजित सब-ज्युनिअर अंडर-15 महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत परिधीने 35 ते 37 किलो वजन गटात सर्वच फेरीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.शेवटच्या फेरीत जोरदार लढत देत कांस्यपदक पटकाविले. अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत तायडे हिने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर राज्यातील बलाढ्य खेळाडूंशी यशस्वी मुकाबला केला.
या यशामागे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक डॉ. सतीशचंद्र भट्ट यांचे मार्गदर्शन तसेच कोच आदित्य माने, योगेश शिवारे आणि सय्यद सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. D.A.V. कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापक अजय डोंगरे यांनी पुढाकार घेऊन सतत प्रोत्साहन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here