Sunday, July 5, 2026
No menu items!
No menu items!
HomeMACCIA पदग्रहण सोहळा ! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिध्दार्थ रुहाटिया यांचा सत्कार

MACCIA पदग्रहण सोहळा ! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिध्दार्थ रुहाटिया यांचा सत्कार

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती वाढवून राज्याचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ॲग्रीकल्चरचा ‘गाव तिथे उद्योजक’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम मोलाचा ठरणार आहे. महाराष्ट्र चेंबरच्या ‘गाव तिथे उद्योजक’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे विशेष कौतुक करताना एमएसएमई क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि AI चा प्रभावी वापर करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अकोला दिव्य छायाचित्र

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित एका शानदार सोहळ्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचा 2026-2028 या पुढील दोन वर्षे करीता गठीत नवीन कार्यकारिणी मंडळचा पदग्रहण व पहिल्या बैठकीत मुख्य पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर विराजमान होते.

यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आ.प्रवीण दरेकर, आ.डॉ.राहुल आवाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.पदग्रहण सोहळ्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र माणगावे आणि उपाध्यक्ष सिध्दार्थ रुहाटिया यांनी पदाची सूत्रे हाती घेतली.
MACCIA पदग्रहण सोहळ्यात अकोला येथील रुहाटिया ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ शिवप्रकाश रुहाटिया यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी MACCIA च्या उपाध्यक्षपदावर अविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी MACCIA चे स्विकृत सदस्य पंकज सतिष राठी, रूहाटिया ग्रुपचे मुख्य व्यवस्थापक राम पाटील व उद्योजक आणि व्यवसायीक उपस्थित होते. मुंबई येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन MACCIA तर्फे करण्यात आले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!