Thursday, June 25, 2026
No menu items!
No menu items!
Home'स्टॅम्प ड्युटी' अकोला जिल्हा निबंधक किरण चौधरीला लाच घेताना रंगेहाथ अटक

‘स्टॅम्प ड्युटी’ अकोला जिल्हा निबंधक किरण चौधरीला लाच घेताना रंगेहाथ अटक

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अलिकडच्या काळात महाराष्ट्र राज्य आणि भारत सरकारच्या प्रत्येक विभागात भ्रष्टाचार चरमशिगेवर पोहचला असून अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील महसूल विभागात तर भ्रष्टाचाराचा बोलबालाच आहे. अकोला तालुका भुमि अभिलेख कार्यालयातील घोटाळ्याची शाई वाळत नाही तोच स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क विभागाचे जिल्हा निबंधकाला १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह संपूर्ण शासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यास लोकांनी पुढाकार घेतला तरच लाचखोरांना लगाम घातला जाईल.

अकोला दिव्य ग्राफिक्स

मुद्रांक जिल्हा निबंधक किरण चौधरी यांना मुद्रांक शुल्काची रक्कम कमी करून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा अकोला एमआयडीसी परिसरातील एका भूखंडावरील थकीत मुद्रांक शुल्क निश्चित करून ते भरण्यासाठी तक्रारदाराने संबंधित कार्यालयाच्या अनेक फेऱ्या मारल्या होत्या. यावेळी त्यांना थकीत शुल्काची रक्कम सांगण्यात आली. मात्र, ही रक्कम कमी करून देण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली.तेव्हा तक्रारदाराने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार किरण चौधरी यांनी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना पंचांसमक्ष रंगेहात ताब्यात घेतले.अकोला जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणात एसीबीने या महिन्यात केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. शासकीय कार्यालयामधील भ्रष्टाचार किती बोकाळला आहे हे लक्षात येते. बहुतांश लोक तक्रार करत नाही. यामुळे अधिकारी माना मुरडतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!