अकोल्यात शुभप्रभात स्वरसाथी परिवारतर्फे कर्तृत्वान महिलांचा सत्कार

0

अकोला दिव्य न्यूज : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्वरसाथी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष हरीश अण्णा मिरजामले यांच्या पुढाकाराने अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालकपदी निवडून आलेल्या अपर्णा शिरीष धोत्रे तसेच प्रभाग क्रमांक चारच्या नगरसेविका निकिता राहुल देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वरसाथी परिवारातर्फे त्यांचे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रांगण येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात अपर्णाताई यांनी एक उत्कृष्ट मराठी भक्तिगीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात स्वरसाथी परिवाराचे अनिल अवचार, महेश सुरेका, राजेन्द्र साखरकर, टिमेश खंडेलवाल, रुपेश पत्ती, विनोद पळसपगार,महेश मल्हार,प्रशांत भारसाकळे
मधुकर मानकर, सुधीर राठोड, श्रद्धानंद बिहाडे, राजेश सोनटक्के नरेश बावने, अनिल पालवे, रविअन्ना संगेकर, कृष्णा सुतार, मनोज गणकर, आप्पाजी अडगावकर तसेच सर्व सदस्य आणि मैदानावर खेळणारे क्रिकेट खिळाडू उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना हरीश अण्णा मिरजामले यांनी व संचालन प्रशांत भारसाकडे आणि आभार प्रदर्शन नरेश बावणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हरिष अण्णा मिरजामले सोबत स्वरसाथी समुहाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here