Homeअकोल्यात 'MBF' ची प्रत्यक्ष कृती ! ‘सहयोग एस्टेट–३’ प्रकल्पाचे उद्या सोमवारी...

अकोल्यात ‘MBF’ ची प्रत्यक्ष कृती ! ‘सहयोग एस्टेट–३’ प्रकल्पाचे उद्या सोमवारी भूमिपूजन

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : एकमेकांच्या अनुभवातून शिकावं, नव्या संधी शोधाव्या, परस्पर सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण करावं आणि शक्य तिथे पार्टनरशिप, जॉइंट व्हेंचरच्या माध्यमातून एकत्रित प्रगती साधावी या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या मारवाड़ी बिजनेस नेटवर्किंग फाउंडेशन ऑफ इंडिया अर्थातच ‘MBF’ आता प्रत्यक्ष कृती एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या रूपाने आकार घेत आहे. समाजाला यशाच्या वाटेवर नेणारी अँड आशिष बाहेती यांच्या नेतृत्वात एक सामाजिक चळवळ असलेल्या MBF च्या नेटवर्किंग ते जॉइंट व्हेंचरपर्यंतचा समृद्ध प्रवासात १० सदस्यांनी तब्बल १० कोटी रुपयांचा हाती घेतलेल्या ‘सहयोग एस्टेट–३’ संयुक्त प्रकल्पाचे उद्या सोमवार २१ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता भूमिपूजन सोहळा आयोजित केला आहे.

संग्रहित छायाचित्र

अकोला शहरातील रिंगरोडवरील ‘डि-मार्ट’ मागील विद्युत कॉलनी येथे साकार होत असलेल्या सहयोग इस्टेट 3 ची जबाबदारी दोन दशकांपासून गुणवत्तापुर्ण बांधकाम, नियोजनबद्ध विकास आणि ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य देत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘सहयोग इन्फ्रासिटी’ला सोपविण्यात आली आहे.

सहयोग इस्टेट 3 हा प्रकल्प कुटुंबांच्या आधुनिक गरजा लक्षात घेऊन जागतिक दर्जाच्या मानकांनुसार विकसित करण्यात आला आहे. प्रत्येक स्क्वेअर फूटचा योग्य वापर, नैसर्गिक प्रकाश व हवा, आकर्षक डिझाईन आणि उत्कृष्ट सुविधाने हा प्रकल्प अकोल्यातील प्रीमियम निवासी प्रकल्पांमध्ये विशेष ठरतो. सहयोग इस्टेट – 3 मध्ये आधुनिकता आणि सुंदर वास्तुरचनेचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळतो. येथे लक्झरी फक्त दिसत नाही, तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवते. प्रशस्त 2 आणि 3 बीएचके निवासी सदनिका मध्ये जागेचा सुयोग्य वापर, उत्कृष्ट अंतर्गत नियोजन आणि शांत, सुरक्षित परिसर यामुळे येथे प्रत्येक क्षण अधिक आरामदायी आणि आनंददायी ठरतो. आधुनिक सुविधा आणि प्रीमियम जीवनशैलीचा अनुभव देणारे सहयोग इस्टेट 3 हे तुमच्या स्वप्नातील घरासाठी एक परिपूर्ण पर्याय आहे.

या भूमिपूजनानने ‘MBF’ कडून एक नवीन संदेश दिला गेला आहे की, स्पर्धा असली तरी सहकार्याची दारं बंद असण्याची गरज नाही. एकमेकांच्या प्रगतीतून स्वतःची प्रगती साधता येते आणि सामूहिक शक्तीतून मोठी स्वप्नं प्रत्यक्षात आणता येतात. ‘सहयोग एस्टेट–३’ ही त्याच विश्वासाची पहिली ठोस पायरी आहे.

.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular