अकोल्यात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला !

0

अकोला दिव्य न्यूज : अकोला ते खामगाव महामार्गावरील अन्नपूर्णा माता मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत कुजलेल्या अवस्थेत एका अनोळखी महिलेचा मृत्यूदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतक महिला गरोदर असल्याची चर्चा असून डाबकी रोड पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले आहे. पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होईल.

अकोल्यातील अन्नपूर्णा माता मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलीस घटनास्थळावर आल्यानंतर ही माहिती वा-यासारखी पसरली. मृतक महिलेचे वय अंदाजे ३५ वर्षांचं असून ती गरोदर असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.महिलेची ओळख पटणार अशी कोणतीही वस्तू घटनास्थळी आढळून आली नाही. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीसांनी मर्ग दाखल केला आहे.

हा घातपात असून अन्यत्र खून करून मृतदेह या ठिकाणी फेकून दिला की याच ठिकाणी घातपात केला आहे काय ? या दृष्टीने शोध घेतला जात आहे. कौलखेड परिसरातील घटना ताजी असतानाच, महिलेचा मृतदेह मिळाल्याने अकोला शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here