Thursday, May 14, 2026
No menu items!
No menu items!
Homeजिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सन्मित्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचं उल्लेखनीय यश

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सन्मित्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचं उल्लेखनीय यश

अकोला दिव्य न्यूज : जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत बिर्ला कॉलनी स्थित सन्मित्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एल.आर.टी. महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

१४ वर्षे वयोगटात सन्मित्र पब्लिक स्कूलचे विद्यार्थी उज्वल करवते आणि रोशन साळवे यांनी प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्तरावर प्रवेश मिळवला असून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

तर १७ वर्षे वयोगटात उज्वल करवतेची बहिण अर्पिता करवते हिने प्रथम क्रमांक आणि त्रिवेणी तायडे हिने द्वितीय क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर आपले स्थान निश्चित केले आहे. हे सर्व विद्यार्थी आता अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विभागीय स्तरावर करणार आहेत.

संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत व प्राचार्या सौ.मनिषा राजपूत यांनी विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच क्रीडा शिक्षक गाढे यांच्या मार्गदर्शनाचेही कौतुक करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालक, शिक्षकवर्ग व सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून विभागीय स्पर्धेसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!