अकोला दिव्य न्यूज : श्री गणराय लाखो भाविकांचे आराध्यदैवत आहे. सर्व संकटांचा नाश करणार्या या देवाला पूजेतही अग्रक्रमाचा मान आहे. येत्या २७ ऑगस्ट रोजी मंगलमूर्ती श्री गणेशाचे आगमन होत आहे. घरोघरी श्री गणेशाची श्रद्धापूर्वक प्रतिष्ठापना केली जाते. वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमूळे पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याकडे कल वाढतो आहे. अनेक मूर्तिकार जनजागृतीचे उद्दिष्ट समोर ठेवून पाण्यात सहज विरघळणार्या तसेच पर्यावरणाचे रक्षण करणार्या सुबक, आकर्षक श्रीं मुर्तीच्या पर्यावरण पुरक चळवळीचा प्रवासात अकोल्यातही अशाच ध्येयाने झपाटलेल्या महिला मूर्तिकार आहेत, रेवती नीरज भांगे !

स्थानिक बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयातून रेवती भांगे यांनी २०१७ साली ‘डीपीएड’ (फाइन आर्ट) कला शिक्षण पूर्ण केले असून, छंदाला व्यावसायिकतेची जोड दिली. अनेक संस्था, संघटना गणेशोत्सव पर्वात शाळा-महाविद्यालयांमध्ये लाल मातीचे गणेशमूर्ती निर्मिती करून त्यामाध्यमातून पर्यावरणपूर्वक चळवळीसाठी सतत कार्यशाळा येत आहेत.अशातच रेवती भांगे आता लाल मातीपासून गणपती बाप्पांच्या आकर्षक मुर्तीची निर्मिती करीत आहेत.

पर्यावरण चळवळीचा ध्यास, ३० हजार बियांचे वितरण !
भाद्रपद महिन्यात गौरी गणपतीचे आगमन होते. या सणांना उत्सवाचे स्वरूप असते. अकोल्याच्या रेवती भांगे अर्ध्या फुटापासून जवळपास दोन फुटापर्यंत आकाराच्या मोजक्या पण लक्षवेधी मूर्ती त्या विलक्षण तन्मयतेने घडवितात. फाईन आर्ट पदविका आर्टिस्ट असलेल्या रेवती भांगे पर्यावरण चळवळ राबवित आहेत. मागील ८ वर्षांपासून त्यांचा हा पर्यावरण चळवळीचा प्रवास सुरू असून जवळपास ३० हजार ’लिली’ फुलांच्या बियांचेही त्यांनी वितरण केले आहे.
