राज्यपातळीवर सन्मित्र पब्लिक स्कूल करणार अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व

0
राज्यपातळीवर सन्मित्र पब्लिक स्कूल करणार अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व

अकोला दिव्य ऑनलाईन : वेट लिफ्टींग खेळामध्ये आयुष मिश्रा याने सतरा वर्षे गटातून विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून राज्य स्तरावर नाव निश्चित करून सन्मित्र पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.आता राज्य स्तरावर तो अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. अकोला येथील रामदास पेठ स्थित सन्मित्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र् राज्य क्रीडा संचालनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेट लिफ्टींग खेळामध्ये हा बहुमान पटकावला आहे.

संस्थेचे अध्यक्ष प्रदिपसिंह राजपूत आणि प्राचार्या मनिषा राजपूत यांनी सुवर्ण पदक देऊन त्यांचा गौरव केला.तसेच क्रीडा शिक्षक गाढे यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थी व पालकांनी राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्यात. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here