Homeमहाराजा अग्रसेन यांच्या विचारांचे अनुकरण करावे — अकोला जनता बॅंकेचे पुर्व एमडी...

महाराजा अग्रसेन यांच्या विचारांचे अनुकरण करावे — अकोला जनता बॅंकेचे पुर्व एमडी प्रदीप गोयनका

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : सकल अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत महाराजा अग्रसेन यांचे विचार सामाजिक समरसतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. समाजात समरसता आणि उद्योगप्रधान व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तरुण पिढीने महाराजा अग्रसेन यांच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक व ज्येष्ठ समाजसेवक प्रदीप गोयनका यांनी केले.

अकोला दिव्य छायाचित्र

अकोट येथील अग्रवाल समिती ट्रस्टच्या वतीने आयोजित अग्रसेन जयंती सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूरच्या समाजसेविका शकुंतला अग्रवाल उपस्थित होत्या. तसेच व्यासपीठावर उषा प्रदीप गोयनका, अग्रवाल समिती ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांत अग्रवाल, सचिव कमलकिशोर झुनझुनवाला, उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश अग्रवाल, कोषाध्यक्ष रामविलास अग्रवाल, अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा भारती अग्रवाल, अग्रवाल सखी मंडळाच्या अध्यक्षा सीए निधी अग्रवाल आणि नवयुवक मंडळाचे अध्यक्ष सुमित अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी अग्रवाल समितीच्या वतीने प्रदीप गोयनका यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

आपल्या मार्गदर्शनात गोयनका पुढे म्हणाले की, आजच्या काळात मुलामुलींच्या विवाहाचे वय वाढत जातं असून, निर्माण होणाऱ्या समस्यांकडे गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. या समस्येवरील महत्वाचा एकच उपाय म्हणजे, युवक-युवतींचे विवाह वयाच्या २४ ते २५ व्या वर्षीच केले पाहिजेत. यामुळे समाजातील घटस्फोटांचे प्रमाण कमी होऊ शकते आणि कौटुंबिक जीवन अधिक सुदृढ व आनंदी बनू शकते.” त्यांनी महाराजा अग्रसेन यांच्या सामाजिक समरसता, उद्योजकता आणि समाजहिताच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले.

Oplus_131072

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार अभिजित श्रावगी यांनी मानले. या जयंती सोहळ्याला अग्रवाल समाजातील महिला, पुरुष आणि तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular