Home'श्रद्धा' देवीच्या चरणी ! 'जागर' निसर्गाच्या रक्षणाचा

‘श्रद्धा’ देवीच्या चरणी ! ‘जागर’ निसर्गाच्या रक्षणाचा

• शहरात २२ ऑक्टोबरपासून ‘निर्माल्य कलश रथ’ कार्यान्वित अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : नवरात्री उत्सवात श्रद्धेने अर्पण केलेले हार, फुले, दूर्वा, बेलपत्रासह अन्य निर्माल्याचे योग्य संकलन आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने मागील १६ वर्षांपासून सुरू असलेला ‘निर्माल्य कलश रथ’ उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे. गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजतापासून शहरातील विविध भागांत रथ फिरणार आहे. अकोलेकरांनी घरातील निर्माल्य कलश रथातच देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मनपा वंचित बहुजन आघाडीचे गटनेता तथा नगरसेवक निलेश रामकृष्ण देव यांनी केले आहे.

•श्रद्धेला हवी पर्यावरण संवर्धनाची जोड !

धार्मिक श्रद्धा जपत निसर्गाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या सामाजिक आणि पर्यावरणपूरक विचारातून निलेश देव यांच्या पुढाकाराने निर्माल्य संकलनाची परंपरा सातत्याने सुरू आहे. यंदाही गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता अशोक वाटिका येथून निर्माल्य कलश रथाच्या संकलन मोहिमेला सुरुवात होणार आहे. शहरातील विविध वस्त्या, अपार्टमेंट, सोसायट्या आणि प्रमुख परिसरांमध्ये निर्धारित वेळेनुसार हा रथ पोहोचणार आहे. नागरिकांनी निर्माल्य रस्त्यावर, नाल्यात किंवा पाण्यात न टाकता रथामध्येच जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

निर्माल्य कलश रथाचे नियोजन शहरातील विविध परिसरांनुसार करण्यात आले असून, त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

सकाळी ९ वाजता — अशोक वाटिका येथून प्रारंभ

जठारपेठेतील सौरभ भगत यांची गल्ली, सुदर्शन देशपांडे यांची गल्ली, जकाते काका परिसर, प्रसाद कॉलनी, रामदूत अपार्टमेंट, अहिर काका परिसर, मनमोहन जोशी यांची गल्ली, कावेरी अपार्टमेंट, बबलू तिवारी परिसर, शिवाभाऊ मोकलकर यांची गल्ली आणि सिद्धिविनायक मंदिर, ज्योतीनगर परिसर.

त्यानंतर — बिर्ला व न्यू तापडियानगर परिसर बिर्ला सी, रामा एम्पायर, अंबे अपार्टमेंट, अमृत सोसायटी, शंकर अपार्टमेंट, विजुभाऊ वाघ यांच्या दुकानाशेजारील गल्ली, राजसरोवर अपार्टमेंट, ऐकदंत अपार्टमेंट, सातपुते साहेब परिसर, ओंकार अपार्टमेंट, न्यू तापडियानगरमधील पाच गल्ल्या आणि महाजनी प्लॉट परिसर.

दुपारी १२ वाजल्यानंतर — विविध वस्त्या व अपार्टमेंट

निखिलेश दिवेकर यांची गल्ली, गोविंद अपार्टमेंट, अनिल मामा कौसल यांचा वाडा, विजय वाघ यांची गल्ली, अॅड. गणेश पाठक यांची गल्ली, राजुभाऊ सोनी यांची गल्ली, राजसरोवर अपार्टमेंट, मनोज सोमण यांची गल्ली, पंकजजी लाहोळे यांची गल्ली, शंकरनगरमधील अॅड. भरत देशपांडे यांच्या घराजवळील परिसर, माधवराव देशमुख यांचे अपार्टमेंट, दिलीप देशपांडे यांचे वैभवलक्ष्मी अपार्टमेंट, हरताळकर काका यांची गल्ली, निखिलजी पांडे यांची गल्ली आणि अनिल सर यांची गल्ली.

दुपारी ४ वाजल्यानंतर: गुप्ते रोड, न्यू गुप्ते रोड व ब्राह्मण सभा रोड परिसर.

सायंकाळी ५ वाजल्यानंतर: उत्तरा कॉलनी परिसर.

सायंकाळी ६ वाजल्यानंतर: न्यू तापडियानगर परिसर.

रात्री ८ वाजल्यानंतर: गड्डम प्लॉट, रामदास पेठ व बिर्ला कॉलनी परिसर.

निर्माल्य पाण्यात नको, निर्माल्य कलश रथातच द्या!” या संदेशातून अकोलेकरांनी पर्यावरण रक्षणाचा संकल्प करावा. श्रद्धा जपत स्वच्छता राखणे आणि पुढील पिढ्यांसाठी निसर्गाचे संवर्धन करणे, हीच माताराणीच्या चरणी खरी सेवा ठरेल. हा उपक्रम निलेश देव मित्र मंडळ, जठारपेठ, अकोला तसेच अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, अकोला यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular