Homeब्रेकिंग न्यूज : अकोल्यातील राजपुतपुऱ्यात इमारत कोसळली ! चौघांना सुखरूप बाहेर...

ब्रेकिंग न्यूज : अकोल्यातील राजपुतपुऱ्यात इमारत कोसळली ! चौघांना सुखरूप बाहेर काढले

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अकोला शहरातील राजपूतपुरा परिसरात अकोला मनपा मोटर वाहन विभागच्या मागे आज रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथे असलेली प्रकाशज यादव यांच्या मालकीची एक जुनी इमारत अचानक पत्त्यासारखी कोसळली. इमारत कोसळताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि आपत्कालीन पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ४ जणांना तात्काळ आणि सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली काही दुचाकी गाडल्या गेल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.‌‌

इमारत किती जुनी होती ? : स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत अनेक दशके जुनी होती आणि गेल्या काही काळापासून ती अत्यंत जीर्ण (शिकस्त) अवस्थेत उभी होती. पावसाच्या आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे या जुन्या इमारतीचा पाया कमकुवत झाला होता, ज्यामुळे आज सकाळी हा संपूर्ण ढाचा कोसळला.

महानगरपालिकेने नोटीस दिली होती का? : मिळालेल्या माहितीनुसार अकोला महानगरपालिकेने (मनपा) या इमारतीची भीषण अवस्था पाहता तिला ‘धोकादायक’ म्हणून घोषित केले होते. मनपा प्रशासनाने घरमालकाला ही इमारत स्वतःहून पाडण्याबाबत कायदेशीर नोटीस बजावली होती. मात्र, घरमालकाकडून या नोटीसकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे.


घटनास्थळी मनपाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन दाखल झाले असून ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे अकोला शहरातील इतरही जुन्या व धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आ

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular