Homeबुद्धिबळामुळे विद्यार्थ्यांची मने प्रज्वलित होतात - डॉ. शैलेश झाला

बुद्धिबळामुळे विद्यार्थ्यांची मने प्रज्वलित होतात – डॉ. शैलेश झाला

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : बुद्धिबळ खेळल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धी पर्यंतचा विकास होऊन त्यांची मने प्रज्वलित होतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. शैलेश झाला यांनी केले. ते आर.बी.चेस अकॅडमी आणि प्रभात किड्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटक म्हणून बोलत होते.

यावेळी मंचावर शिक्षा संस्कृती न्यास नवी दिल्लीचे डॉ. राजीव पंड्या, डॉ. कल्पेश पाठक, कौन्सिलर फॉर टीचर्स एज्युकेशन गुजरातचे जिग्नेश पटेल, प्राचार्य डॉ. सुहास पाटील, प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, मुख्य आर्बीटर प्रशांत धंगेकर, आर.बी.चेस अकॅडमीकचे संचालक राहुल भारसाकळे, प्रभातचे क्रीडा विभाग प्रमुख स्वप्निल मांदाळे व उप-विभाग प्रमुख आशिष बेलोकार यांची उपस्थिती होती.

आपल्या प्रास्ताविकात डॉ.गजानन नारे यांनी आपल्या पाल्याला बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल सर्व पालकांचे अभिनंदन केले व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. त्यानंतर मान्यवरांनी रितसर चेस खेळून या स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 200 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. ह्या प्रसंगी पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

संपूर्ण स्पर्धांचे संचालन व आभार प्रदर्शन कल्याणी सांगूनवेढे व प्रकाश गुडीकुंडलवार यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीधर कौशल, प्रा. बाळासाहेब तायडे, महेश खोट्टे, बाळासाहेब बोदडे, समृद्धी देशमुख, भावनेश तेलकर, राहुल वानखडे, विशाल कोथळकर, गोविंद सारडा, रिया तरम, शितल गावंडे यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular