Wednesday, July 8, 2026
No menu items!
No menu items!
Homeसुप्रसिध्द 'श्री हिरा स्विट' चा उत्पादन परवाना निलंबित !

सुप्रसिध्द ‘श्री हिरा स्विट’ चा उत्पादन परवाना निलंबित !

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : विदर्भातील सुप्रसिद्ध ‘श्री हिरा स्वीट’ या नावाने मिष्ठान्न आणि फरसाणचे उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या उत्पादन विभागाची तपासणीतून मेलेला उंदीर आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्या. यासोबतच उत्पादन प्रक्रियेत व स्वच्छतेच्या बाबतीत अनेक त्रुटीही आढळल्याने सार्वजनिक आरोग्यासाठी हे अत्यंत धोकादायक असल्याने अन्न व औषध प्रशासनाने या आस्थापनाचा परवाना तात्पुरता निलंबित केला असून, उत्पादन युनिट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नागपुरातील पाचपावली येथील श्री हिरा स्वीटवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात धडाकेबाज कारवाई सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये यासाठी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात राज्यभरात हॉटेल्स, रेस्टॉरंट, स्वीट्सच्या दुकानांची कारखाने, दूध डेअर, दूध संकलन केंद्र अशा वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई सुरु आहे. अस्वच्छता किंवा नागरिकांच्या आरोग्यास धोका होईल अशा गोष्टी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जात आहे. नागपुरात अशीच मोठी कारवाई नागपुरातील पाचपावली येथील श्री हिरा स्वीटवर करण्यात आली आहे.

सहाय्यक आयुक्तांची प्रतिक्रिया
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अजय सदार यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यामुळे श्री हिरा स्वीटचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे. संबंधित आस्थापनाने सर्व त्रुटी दूर करून आवश्यक स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि उत्पादन प्रक्रियेत सुधारणा केल्यानंतरच त्यांना पुन्हा उत्पादन सुरू करता येणार आहे. सुधारणा पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाकडून पुन्हा तपासणी केली जाईल. अहवाल समाधानकारक आढळल्यास तो आयुक्तांकडे सादर करण्यात येईल आणि त्यानंतरच परवाना निलंबन मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

अन्न-औषध प्रशासनाचा स्पष्ट इशारा
दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या राज्यव्यापी मोहिमेमुळे अन्न व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!