अकोल्याचा अनुज पनपालिया पहिला !जलतरण स्पर्धा

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या क्रीडा स्पर्धेत अमरावती विभागीय जलतरण स्पर्धेत अकोला येथील अनुज आशिष पनपालिया यांनी दोन गटातील बटरफ्लाय तरण स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि फ्री स्टाईल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत अकोला क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. यशाबद्दल अनुज पनपालिया याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

अमरावती क्रीडा विभागाच्या वतीने यवतमाळ येथे अलिकडेच आयोजित विभागीय जलतरण स्पर्धेत अकोला येथील माउंट कारमेल शाळेचा विद्यार्थी अनुज आशिष पनपालियाने १२-१४ वर्ष या वयोगटातील २५ मिटर बटरफ्लाय आणि ५० मीटर बटरफ्लाय तरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद संपादन केले. यासोबतच २५ मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत अनुजने द्वितीय स्थान प्राप्त केले.

अकोला माहेश्वरी समाजाचे वरिष्ठ नागरिक आणि जेष्ठ धन्वंतरी डॉ. चंद्रकांत पनपालिया यांचा अनुज हा नातू आणि डॉ.आशिष व डॉ. सपना पनपालिया यांचा मुलगा आहे. माऊंट कारमेल शाळेचे प्राचार्य फादर जोसलीन तसेच वसंत देसाई स्टेडियम येथील जलतरणपटूचे प्रशिक्षक योगेश पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here