अकोल्यात पोलिस स्टेशन समोरच नगर सेविकेचा पतीचा खून ! एकाला अटक, एक फरार

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अकोल्यातील गुन्हेगारांनी डोके वर काढले असून, कायद्याचा वचक राहिला नसल्याने पोलिस स्टेशन समोरच भरदिवसा एकावर धारधार चाकूने सपासप वार करून खून करण्याच्या घटना घडल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली असून या घटनेत मृत्यू पावलेल्या मृतकाचे नाव याकूब उर्फ याकूब खान पहलवान आहे. अकोला महापालिका प्रभाग क्रमांक १७ च्या काँग्रेस नगरसेविका रफिया बी यांचे याकूब खान हे पती होते. पुर्व वैमनस्यातून याकूब खानचा खून झाला असून मारेकरी मृतकाचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे. रामदासपेठ पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत तपासाला गती दिली आहे. सदर प्रकरणात संशयितासह दोनच आरोपी असून एक आरोपी फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार, दुपारच्या वेळी याकूब पहलवान हे रेल्वे स्थानक परिसरात चहा घेऊन स्टेशन रोडने जूने शहरातील नवाबपुरा येथील घराकडे जात होते.रामदास पेठ पोलिस ठाण्यासमोर रस्त्यावर समोरून भरधाव वेगाने आलेल्या एका दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेत याकूब खान रस्त्यावर खाली पडताच आरोपीने याकूब पहलवान यांच्यावर छातीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात याकूब खान गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी याकूब पहलवान यांना प्रथम शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान याकूब खानच्या छातीवर, पोटावर, डावे माडीवर चाकुचा सपासप वार करून पळून जात असलेल्या इसमाला पोलीस स्टेशनचे पोहवा प्रविण ढगेकर (ब न ९७) यांनी तत्परता दाखवत जिवाची पर्वा न करता शिताफिने पकडुन ठाण्यातआणले.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पूर्ववैमनस्य, नियोजित हल्ला किंवा अन्य कोणता कारणीभूत मुद्दा आहे का, याचा तपास रामदासपेठ पोलीस करीत आहेत. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्यात आले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताने दिलेल्या माहितीनुसार संशयितासह दोन आरोपी असून एक फरार आहे. भरदिवसा पोलिस ठाण्यासमोर झालेल्या या घटनेमुळे पोलिसांचा आणि कायद्याचा वचक राहिला नाही.असे दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here