Thursday, May 14, 2026
No menu items!
No menu items!
Homeअ‍ॅड.आशिष बाहेती उवाच, विवेकी व भविष्यसूचक अर्थसंकल्प

अ‍ॅड.आशिष बाहेती उवाच, विवेकी व भविष्यसूचक अर्थसंकल्प

अकोला दिव्य न्यूज : केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीमुळे सरासरी करदात्याला आत्मविश्वास आणि दिलासा मिळणार असून, सरकारने प्राप्तिकर स्लॅबमध्ये कोणतेही बदल न करून स्थिरता राखली आहे.असं मत पश्चिम विदर्भातील नामवंत वित्त आणि कर सल्लागार अ‍ॅड.आशिष बाहेती यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करून व्यक्त केले.

१ एप्रिल २०२६ पासून लागू होणारा नवीन प्राप्तिकर कायदा कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करेल. यासोबतच जीएसटी दर न वाढवून महागाई नियंत्रित करण्याचा सरकारचा मानस असल्याचे दिसून येत आहे. व्यावसायिक आणि सामान्य लोकांना डोकेदुखी ठरणाऱ्या डीएस आणि टीसीएसचे नियम सोपे केल्याने लोकांना अनावश्यक त्रासांपासून मुक्तता मिळेल.असे बाहेती यांनी सांगितले.

हे अर्थसंकल्प दाखवून देते की सरकार कर संकलनासोबतच करदात्यांसाठी सोयीला प्राधान्य देते. अनेक क्षेत्रात सुलभीकरण करण्यात आले असून एकंदरीत, हे एक विवेकी आणि भविष्यसूचक अर्थसंकल्प आहे. असं विश्लेषण करून आशिष बाहेती यांनी सामान्य लोकांना अर्थसंकल्प उलगडून दाखवले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!