अकोला दिव्य न्यूज : केंद्रीय अर्थसंकल्पात कर प्रक्रिया पारदर्शक, सहज आणि सुटसुटीत करून, उद्योग व व्यवसायाचा विकासाला गती देण्यावर भर दिला आहे. व्यापारी, प्रोफेशनल आणि सामान्य माणसाला अधिक प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प, असं मतं सनदी लेखापाल आणि सनदी लेखापाल अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन व कोचिंग देण्यासाठी अग्रक्रमावर असलेल्या निरज राठी करीअर फोरमचे संस्थापक संचालक निरज राठी यांनी व्यक्त केले.

सरलीकृत कर प्रणालीद्वारे व्यवसायांवरील अनुपालनाचा भार कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे व्यवसाय करण्याची सुलभता आणखी सुधारेल.या अर्थसंकल्पात व्यवसाय वाढ, गुंतवणूक आणि आर्थिक क्रियाकलापांना चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे सरासरी करदात्याला आत्मविश्वास आणि दिलासा मिळतो.
आयकर स्लॅबमध्ये स्थिरता राखली असून येत्या १ एप्रिल २०२६ पासून लागू होणारा नवीन प्राप्तिकर कायदा कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करेल. केंद्र सरकार कर संकलनासोबतच करदात्यांसाठी सोयीला प्राधान्य देते असल्याचे अर्थसंकल्पात दिसून येत आहे. एकंदरीत दूरगामी परिणाम करणारा भविष्यसूचक अर्थसंकल्प आहे.असं निरज राठी यांनी सांगितले.
