अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात बेजोड खेळाचे प्रदर्शन करत विभागीय स्तरावर निवड होण्याची उल्लेखनीय कामगिरी येथील सन्मित्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत देसाई स्टेडियम येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १४ वर्षे वयोगटात मुलींमधून आराध्या गुणवंत वाकोडे तर मुलांमधून अथर्व संतोष पस्तापुरे यांची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. १७ वर्षे वयोगटात मुलींमधून निधी जाधव व प्राविण्या शेगोकार, तर मुलांमधून संकेत पवार यांची निवड झाली आहे.
तसेच रिदमिक जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात १४ वर्षे वयोगटातून आराध्या गुणवंत वाकोडे आणि १७ वर्षे वयोगटातून निधी विठ्ठल जाधव यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. हे सर्व विद्यार्थी आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेत अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. प्रदीपसिंह राजपूत आणि प्राचार्या सौ. मनिषा राजपूत यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री. गाढे सर यांचेही अभिनंदन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत व प्राचार्या मनिषा राजपूत यांची प्रेरणा व क्रीडा शिक्षक गाढे यांच्या मार्गदर्शनामुळे सन्मित्र पब्लिक स्कूलने शैक्षणिक क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपली उल्लेखनीय कामगिरी कायम राखली आहे.
‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास’ हे विद्यालयाचे ध्येय असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रीडा, कला आणि विविध उपक्रमांमध्ये त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक व सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत असून, विभागीय स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.