अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : दहावी-बारावीनंतर पुढे काय? परदेशात शिक्षण कसे घ्यावे? शैक्षणिक कर्ज कसे मिळवावे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता एकाच छताखाली मिळणार आहेत. संपूर्ण विदर्भात प्रथमच अकोला महानगरात ‘एज्यु एक्स्पो २०२६’ या भव्य तीन दिवसीय शैक्षणिक प्रदर्शनीचे आयोजन युवा सक्षम फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दिनांक १४, १५ व १६ नोव्हेंबर २०२६ रोजी आरडीजी कॉलेजच्या प्रांगणात पार पडणार असून, सर्वांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे. दररोज सकाळी १०.३० ते रात्री ८.३० या वेळेत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहील.

महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि आकर्षणे
- १२० हून अधिक स्टॉल्स: केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण, परदेशातील संधी, करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक कर्ज, आणि कौशल्य विकासाशी संबंधित नामांकित संस्थांचे स्टॉल्स.
- इस्रोची (ISRO) फिरती प्रयोगशाळा: विज्ञान आणि अवकाश तंत्रज्ञानाची उत्सुकता वाढवण्यासाठी इस्रोचे वैज्ञानिक स्वतः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार.
- प्रमुख शहरांचा सहभाग: मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबाद आणि हैदराबाद येथील नामांकित शैक्षणिक संस्था व कंपन्यांशी विद्यार्थ्यांना थेट संवाद साधता येणार.
- मनोरंजन आणि ज्ञान: ‘करिअर अनकट’ लाइव्ह पॉडकास्ट, फ्युचर स्किल्स अरेना, क्रिएटर कॉन्क्लेव्ह, भजन जॅमिंग, फूड झोन आणि गेम झोनचा विशेष समावेश.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यशाळा :
प्रदर्शनादरम्यान दररोज खालील विविध विषयांवर मोफत कार्यशाळा आयोजित केल्या जातील.
संरक्षण सेवा आणि विधी (Law) क्षेत्रातील करिअर
- कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स आणि भविष्यातील तंत्रज्ञान
- अभियांत्रिकीपलीकडील संधी आणि खेळातून करिअर
- स्पर्धा परीक्षांची तयारी, एमबीबीएस व बीडीएसनंतरचे पर्याय
- डिजिटल युगातील सकारात्मक पालकत्व आणि उद्योजकता विकास
आठ जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती
या महोत्सवाला अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या आठ जिल्ह्यांतील लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षक भेट देणार आहेत. मोठ्या शहरांमध्ये न जाता आपल्याच परिसरात करिअरच्या अमर्याद संधी शोधण्याची ही मोठी सुवर्णसंधी आहे.
शैक्षणिक संस्थांसाठी स्टॉल नोंदणी व ‘इनोव्हेटिव्ह एज्यु अवॉर्ड’
उच्च शिक्षण संस्था, बँका, एड-टेक कंपन्या आणि स्पर्धा परीक्षा केंद्रांसाठी येथे स्टॉल्स उपलब्ध आहेत. स्टॉल्सची संख्या मर्यादित असल्याने इच्छुकांनी त्वरित नोंदणी करावी.
तसेच, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि प्राचार्यांचा ‘इनोव्हेटिव्ह एज्यु अवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. पात्र संस्थांनी आपले प्रपोजल आयोजकांकडे पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘तीन दिवस, एक व्यासपीठ, अमर्याद संधी’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या भव्य शैक्षणिक महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवा सक्षम फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला आयोजन समितीचे दिलीपराज गोयनका, पंकज कोठारी, डॉ. गजानन नारे, हरेश शाह, जयंत पडगिलवार, निकेश गुप्ता, डॉ. पवन माहेश्वरी, डॉ. नितीन ओक, नरेंद्र देशपांडे, सिद्धार्थ रुहाटिया, आलोककुमार गोयनका, राजेश जोध, अजय सेंगर, अमोल अग्रवाल, ललित काळपांडे, सिमरणजीत सिंग नागरा, सचिन बुरघाटे, सौरभ गोयनका, शार्दुल दिगंबर, नितीन बाठे, राम ठक्कर, प्रफ्फुल संघवी, मधुर खंडेलवाल, ब्रिज मोहन चितलांगे, सुनील नंद, प्रा. शारदा बियाणी, मोहिनी मोडक, काजल राजवैद्य, सीमा बक्षी, सुनील अग्रवाल, मो. सोहेल अख्तर, प्राचार्य डॉ. ललित भट्टी, परिमल मुजमुदार, प्रा. राम बाहेती, विजय तांदळे, योगेश पडीगेल, नीरज राठी, संतोष कुटे व सुमित गोयंका आदी उपस्थित होते.