Homeअकोल्यात शास्त्रीनगर जैन स्थानक भूमिपूजन सोहळा संपन्न

अकोल्यात शास्त्रीनगर जैन स्थानक भूमिपूजन सोहळा संपन्न

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या शास्त्रीनगर येथील जैन स्थानक बांधकामाचा भूमीपूजन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रविण खटोड यांच्या नेतृत्वात नवकार मंत्राचा जप करण्यात आला. श्रीमती चंपाबाई फत्तेचंद कोठारी परिवार यांच्या वतीने सतिश फत्तेचंद कोठारी यांनी भूमीपूजनाचा मान मिळविला होता. यावेळी श्रीमती शकुंतलाबाई कोठारी, डॉ.नवीन कोठारी व अशोक कोठारी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. सुभाषचंद बेदमुथा व डॉ.सौ.सुनिता खटोड, सुरेश मुणोत यांनी मंत्रोच्चाराव्दारे पुजा विधी पार पाडला.

यावेळी भूमीपूजनाचा लाभार्थी कोठारी परिवाराचे सदस्य डॉ.नवीन कोठारी, अशोक कोठारी, राहुल कोठारी व नवकारशीचे लाभार्थी खटोड परिवाराचे सदस्य सुगनचंद खटोड, शैलेश खटोड, सुकेश खटोड यांचा सुभाषचंद बेदमुथा व सीए रमेश चौधरी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सुभाषचंद बेदमुथा यांनी प्रास्ताविक भाषण केले. यावेळी रमेश चौधरी आणि नरेश संकलेचा यांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुभाष गादीया यांनी केले.

भूमीपूजनाचे लाभार्थी सतिश कोठारी यांनी अमेरिकेतून व्हिडिओ काॅलव्दारे उपस्थिती दर्शविली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत कोठारी, राजेश सोजतिया, जितेश संकलेचा, विजय चौधरी, नितीन चौधरी, शैलेश कोरडिया व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रमेश चौधरी, सचिव सुभाषचंद बेदमुथा विश्वस्त डॉ.नवीन कोठारी, प्रा.सुभाष गादीया, प्रमोद संघवी, शैलेंद्र पारख, शैलेश खटोड, प्रविण कर्नावट, आलोक जैन आणि जैन समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular