Sunday, June 14, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्याच्या 'दऊत लेखणी' ने पटकाविला 'छंदश्री' आंतरराष्ट्रीय दिवाळी पुरस्कार

अकोल्याच्या ‘दऊत लेखणी’ ने पटकाविला ‘छंदश्री’ आंतरराष्ट्रीय दिवाळी पुरस्कार

अकोला दिव्य न्यूज : पुणे येथील छंद श्री प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘छंदश्री’ आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेमध्ये अकोला येथील ‘दऊत लेखणी’ मासिकाने ‘छंदश्री तृतीय पुरस्कार’ पटकविला आहे. पुणे येथील छंद श्री प्रतिष्ठानातर्फे ‘दऊत लेखणी’अंकाचे मुख्य संपादक विजय देशमुख यांनी पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एका शानदार समारंभात हा पुरस्कार स्वीकारला. सन 2025 च्या दिवाळीनिमित्त घेतलेल्या स्पर्धेचा निकाल एका आठवड्यापूर्वी घोषित करण्यात आला आहे.

प्रख्यात गायक व संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांची मुलगी राधाताई मंगेशकर यांचे हस्ते विजय देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या अंकाचे अतिथी संपादक म्हणून नांदेड येथील डॉ. पृथ्वीराज तौर व अकोला येथील डॉ. स्वाती दामोदरे यांनी काम बघितले होते. याच अंकातील रशियन कथेच्या ‘सोन्याचा दात वाली बाई’या अनुवादित कथेसाठी डॉ.अमित पंडित यांना अनुवादित साहित्य विभागांमध्ये द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सुमारे 45 वर्षांपूर्वी 1981 साली अकोला येथून प्रकाशन सुरू झालेल्या ‘दऊत लेखणी’ मासिकाने आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त केले असून संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त केले आहे. मागील 45 वर्षापासून या अंकाच्या प्रसिद्धीचे काम अकोल्यातील जेष्ठ पत्रकार प्रदीप खाडे सांभाळीत असून त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर या अंकाची ख्याती पोहोचविली आहे. अकोल्यातील सेवानिवृत्त न्यायाधीश अँड.शशिधर गोगरकर, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप खाडे, प्रा.शारदा बियाणी, प्रा.डॉ.मोहन गद्रे, प्रा.डॉ. दिलीप इंगोले, प्रा.डॉ.सुहास उगले, प्रा.डॉ.निळकंठ इंगळे, लक्ष्मीकांत देशमुख, सुभाष सातव, प्रा. डॉ. मोहन खडसे, डॉ. विनय दांदळे, श्रीकांत गोंधळेकर, गीता बाली उनवणे, डॉ. सुबाहु ठोसर, अरविंद देशमुख, प्रा.डॉ.श्रीकांत उखळकर, डॉ. रामप्रकाश वर्मा, विजय दळवी, संजय कोटणीस, प्रा. डॉ. दीपक दामोदरे, निलेश पाकदुणे आदी मंडळी या अंकाच्या भरभराटीसाठी विजय देशमुख यांना सहकार्य करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!