अकोला दिव्य न्यूज : सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोदावरी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंग राजपूत व शाळेच्या प्राचार्या मनीषा राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत महाराष्ट्र गीत सादर केले. शारीरिक शिक्षक गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना आकर्षक मानवंदना दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीपसिंह राजपूत तर प्राचार्या मनीषा राजपूत मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रसंगी 2025–26 चा शालेय परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रत्येक वर्गातून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
नर्सरीमधून अंशिका वाडेकर प्रथम व भाविका जानोकार द्वितीय, केजी-१ मधून उत्कर्ष सोळंके प्रथम व आराध्या वाडेकर द्वितीय, तर केजी-२ मधून राघव मोंढे प्रथम व स्वरित गाडगे द्वितीय क्रमांक पटकावला. इयत्ता पहिलीमध्ये शिवण्या पवार व श्रद्धा भागवत यांनी प्रथम क्रमांक विभागून मिळवला, तर काव्या राऊत व सर्वज्ञ सावरकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. इयत्ता दुसरीत आर्या मोहड प्रथम व आर्या वासनकर द्वितीय, तिसरीत तानसी पळसपगार प्रथम व प्रियांशी वाडेकर द्वितीय, चौथीत स्वराज हरणे प्रथम व अंजली भालकर द्वितीय ठरले.
पाचवीत गुंजन मंजूरकार व आराध्या बहुराशी यांनी प्रथम क्रमांक विभागून मिळवला, तर आदिती पारधी द्वितीय ठरली. सहावीत सर्वज्ञ कापसे प्रथम व ईश्वरी सातव द्वितीय, सातवीत समृद्धी डांगे प्रथम व गायत्री चारोडे द्वितीय, आठवीत श्रेयस भटकर प्रथम व अनुष्का जुनारे द्वितीय, तर नववीत तन्वी पळसपगार प्रथम व समीक्षा बऊराशी द्वितीय ठरल्या.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अध्यक्ष राजपूत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मिळालेली पदके व ट्रॉफी ही पुढील यशासाठी प्रेरणा देणारी असतात. विद्यार्थ्यांनी अधिक यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवून वाचनाची आवड निर्माण करावी, असे त्यांनी आवाहन केले.
प्राचार्या मनीषा राजपूत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन खानझोडे व प्राजक्ता उपश्याम यांनी तर आभार प्रदर्शन देशमुख मॅडम यांनी केले.
