Wednesday, April 15, 2026
No menu items!
No menu items!
Homeभ्रष्टाचार शिगेला ! अकोला अतिरिक्त कलेक्टरवर गुन्हा दाखल

भ्रष्टाचार शिगेला ! अकोला अतिरिक्त कलेक्टरवर गुन्हा दाखल

अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद राहुल गायकवाड यांच्या विरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. स्टोनक्रशर उद्योजक विवेक बिजवे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात १३ एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारीची शहानिशा करत खंडणी मागितल्याचा पुरावा म्हणून दिलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता सिद्ध झाल्याने अखेर खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे जिल्ह्याच्या महसूल विभागात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल, खाणीकर्म आणि भुमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्ट्राचार चरमशिगेवर पोहचला आहे. मोठा वरदहस्त असल्याने अधिकारी मस्तावले आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन कोणाच्या तरी आशीर्वादाने दाबून मुंबई-ठाणे येथील एका मोठ्या इन्फ्रा कंपनीला कोट्यवधीचा फायदा मिळवून दिला आहे.

बार्शी टाकळी तालुक्यातील ‘बिजवे स्टोन क्रशर’ उद्योगाचे संचालक आणि या प्रकरणातील तक्रारदार व अकोला शहरातील गोरक्षण रोड निवासी विवेक प्रभाकर बिजवे (६२) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात १३ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ९ मार्च २०२६ रोजी आपल्या साईटवरून निघत असताना सकाळी अंदाजे ११:३३ वाजता त्यांना अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला. ते म्हणाले, तुमच्या संघटनेची बैठक होत आहे. ही या वर्षीचा बैठक असून अतिरिक्त जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत, म्हणून मला दरमहा १५ हजार रुपये आणि इतर सदस्यांना ५ हजार रुपये द्या. एवढेच नव्हे तर, जर तुम्ही पैसे दिले नाहीत, तर तुम्ही करत असलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी अधिकारी पाठवले जातील आणि ते काम बेकायदेशीर घोषित करून थांबवले जाईल.अशी धमकी देण्यात आली. असं बिजवे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

यावर तक्रारदार बिजवे यांनी गायकवाड यांना तेव्हा उत्तर दिले की, मार्च अखेरच्या सेटलमेंटमध्ये अडचण आहे, त्यामुळे मार्चनंतर सर्व सदस्यांना भेटून त्यांच्या मागणीनुसार रक्कम देवू. तेव्हा चिडले आणि म्हणाले, “पैसे घेऊन या, नाहीतर मला कारवाई करावी लागेल. त्यानंतर त्याने पैशांसह आपल्या त्यांच्या घरी बोलावले. त्याच दिवशी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी गेलो आणि ५०० रुपयांचा नोटांसह १५ हजार रुपये रोख दिले. यानंतर त्यांच्या घरीच गायकवाड म्हणाले की, सर्व सदस्यांनाही दरमहा १५,००० रुपये जमा करावे लागतील. तेव्हा इतर सदस्यांकडून पैसे गोळा करून त्यांना आणून देतो, मात्र तोवर त्यांचे काम चालू ठेवू द्यावे, अशी विनंती केली.

अकोला माईन क्रशर असोसिएशनचे बिजवे हे कार्यकारी अध्यक्ष असल्याने त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची ही मागणी संघटनेच्या सदस्यांनी सांगितले. सर्व सदस्यांनी नकार देत, याविरोधात तक्रार दाखल करण्यावर भर दिला. सदस्यांनी पाठबळ दिले आणि या विरोधात तक्रार दाखल केली.असं बिजवे यांनी आपल्या तक्रारी नमूद केले आहे.

स्टोन क्रशर ऑपरेटर विवेक प्रभाकर बिजवे यांच्या तक्रारीवरून, एमआयडीसी पोलिसांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद राहुल गायकवाड यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ३०५ (२), भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ३५१ (१) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक इशानी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

स्टोन क्रशर व्यावसायिकांना सरकारला रॉयल्टी द्यावी लागते आणि ते ती नियमितपणे देत असतात. दरवर्षी स्टोन क्रशर व्यावसायिक रॉयल्टीची रक्कम अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा करता. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची धाकदपटशा करीत पैशांची केलेली मागणी चक्क खंडणी वसूलीचा प्रकार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!