Tuesday, April 14, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात 2 ठिकाणी घरफोडी ! लाखोचे दागिने लंपास : चोरट्यांचे आव्हान

अकोल्यात 2 ठिकाणी घरफोडी ! लाखोचे दागिने लंपास : चोरट्यांचे आव्हान

अकोला दिव्य न्यूज : शहरात लागोपाठच्या हत्यांमुळे नागरिक दहशतीखाली वावरत असताना, एकच रात्री चोरट्यांनी दोन घरफोडी करून, लाखोंचा ऐवज लंपास केल्याचे शहरात गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. गंगानगर परिसरातील अली पब्लिक स्कूल रोड लगत असलेल्या डुप्लेक्स मध्ये शेख निसार शेख मोला यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून सोन्याचे हार, कानाचे आयरिंग, चांदीची पैंजण लंपास केले.अंदाजे साडेचार लाख रुपये किंमतीच्या दागिन्याची चोरी झाल्याचे शेख निसार यांनी सांगितले.

शेख निसार व त्यांची पत्नी 12 एप्रिल रोजी गावी गेले असताना ही घटना 13 एप्रिलला रात्री घडली. आज 14 एप्रिल रोजी गावावरून परत आले असताना त्यांना त्यांच्या घरातील कुलूप तुटलेले दिसले. घरात गेले असता घरातील अलमारी आणि इतर साहित्य अस्तव्यस्त दिसले. चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी जुने शहर पोलीस स्टेशन येथे चोरीची फिर्याद नोंदविली.

जुने शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.यासोबतच अमिन शहा चक्कीची गल्लीमध्ये शेहजाद नामक व्यक्तीच्या घरी कोणी नसताना चोरट्यांनी कुलूप तोडून सोन्याचे दागिने लंपास केले. एकच दिवशी दोन ठिकाणी चोरीच्या घटना गंगानगरमध्ये घडल्या असून चोरट्यांनी जुने शहर पोलिसांना जणू आव्हान केले आहे. जुने शहर पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त करण्याचे मागणी नागरिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!