Friday, April 17, 2026
No menu items!
No menu items!
Homeसुसंस्कृत समाज व जातीय समानतेसाठी डॉ. आंबेडकरांची शिकवण अत्यावश्यक- नगरसेवक तुरकर

सुसंस्कृत समाज व जातीय समानतेसाठी डॉ. आंबेडकरांची शिकवण अत्यावश्यक- नगरसेवक तुरकर


मिल्लत मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
अकोला दिव्य न्यूज : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिल्लत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सरफराज नवाज खान यांच्या अध्यक्षतेत मिल्लत शिक्षा संकुलात उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रेम शंकर तिवारी, नगरसेवक शरद तुरकर, माजी नगरसेविका वंदना वासनिक, ज्योती खिल्लारे, मंडळ अध्यक्ष रमेश करिहार, अमित वासनिक, अब्दुल कादर, माजी पोलीस अधिकारी सैय्यद मतीनुद्दीन, हिमायू खान, मिल्लत संस्थेचे संचालक ॲड. रबी अहमद खान, प्राचार्य मुबीन उर ​​रहमान, मु.अ.कौसर जहाँ, यास्मिन बानो, इश्तियाक हुसेन, मोहम्मद अफसर, नियामत अली, सैय्यद मजहर, फातेमा अंजुम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

इयत्ता नववीचा विद्यार्थी मोहम्मद मुजम्मिल याच्या कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली. वंदना वासनिक आणि शरद तुरकर यांनी विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकरांचे आदर्श अंगीकारण्याचे आवाहन केले. सुसंस्कृत भारतीय समाज व जातीय समानतेच्या महत्त्वावर भर दिला. आपल्या अध्यक्षीय भाषणात, सरफराज नवाज खान यांनी सांगितले की, जे समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वस्व त्याग करतात, त्यांना जग स्मरणात ठेवते. यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव अग्रस्थानी येते.अनेक अडचणी व आव्हानांना न जुमानता, उच्च शिक्षण घेऊन त्यांनी हे सिद्ध केले की, शिक्षणाशिवाय जीवन पांगळे आणि निर्जीव आहे, म्हणूनच, कोणत्याही परिस्थितीत शिक्षण घेणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे.

या कार्यक्रमाचे संचालन शिक्षक इश्तियाक हुसेन आणि आभार प्रदर्शन प्राचार्य मुबीन उर ​​रहमान यांनी केले. मोहम्मद शकील, नोमान आबिद, वासिक खान, अनिक अर्शद, रिजवान खान, तन्वीर अहमद खान, खुर्शीद अली, अन्वर बेग, शुमाएला अंजुम, शकीला बेगम, शगुफ्ता परवीन, अरफा मिश्कात, कल्पना साहू, वंदना लोणकर, सुफी खान, आसिफ खान, काझी अजहर आणि इतर कर्मचारी सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!