Sunday, April 19, 2026
No menu items!
No menu items!
Homeआज शेवटची संधी ! अकोल्यातील 'सालासर बालाजी' मधिल 'हिंदवी स्वराज्य' देखावा

आज शेवटची संधी ! अकोल्यातील ‘सालासर बालाजी’ मधिल ‘हिंदवी स्वराज्य’ देखावा

अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरात पहिल्यांदाच मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या इतिहासातील शोर्य व स्वाभिमानाची परंपरा निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या ‘हिंदवी स्वराज्य’चा देखावा बघून अकोलेकर भाविक भक्त आणि शिवप्रेमी अक्षरशः भारावून गेले.

अकोला दिव्य छायाचित्र

गत ३ दिवसात हजारों भाविकांनी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाळी वातावरणात देखील आपल्या बालबच्च्यांसोबत सालासर बालाजी मंदिरात जाऊन शिवकालीन इतिहासाचा मागोवा घेतला. शिवकालीन देखावा आज शनिवार ४ एप्रिल रोजी दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

गंगानगर बायपास परिसरातील सालासर बालाजी मंदिरात अनेक वर्षापासून विविध उत्सव साजरे करतांना धार्मिक विधी पुजा अर्चा सोबतच अद्भूत व नयनरम्य विविध देखावे सादर केले जातात.या परंपरेला साजेसा यंदा पहिल्यांदाच ३ दिवशीय हनुमान जन्मोत्सव 2 ते 4 एप्रिलपर्यंत आयोजित करीत मंदिर परिसरात इतिहासातील शोर्य व स्वाभिमानाची परंपरा निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवकालीन ‘हिंदवी स्वराज्य’ चा देखावा साकारला आहे. या चलित देखाव्याने भाविकांचे लक्ष वेधले आहे. प्रभू श्रीराम, सीता आणि हनुमान यांच्या उंच आणि आकर्षक व नयनरम्य मुर्त्या डोळ्यांचे पारणे फेडते. बच्चे कंपनी या मुर्त्यासोबत फोटो काढत आहेत. तर मोठें सेल्फी काढून शेअर करत आहेत.

शिवाजी महाराजांच्या सेवेतील कट्टर मावळ्यांची आणि अश्व (घोडे) यांची माहिती लावलेले फलक लहान मोठ्यांच्या ज्ञानात भर देणारी आहे. उंचपुऱ्या हत्ती आणि हत्ती वरील अंबारीत विराजमान शिवाजी महाराज आणि त्यांच्या हत्ती जवळ उभे महिला पुरुष असा साकारलेल्या देखाव्यातील हालचाल बच्चे कंपनीला आनंद देऊन जातो. आज शेवटची संधी सोडता कामा नये कारण आजवरच्या शिवजयंती उत्सवात अशा प्रकारचा चलित देखावा सादर केला गेला नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!