घरवापसी ! उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पांडे गुरुजींचा शिवसेनेत प्रवेश ; बाजोरियांचा पुढाकार

0

अकोला दिव्य न्यूज : शिवसेनेचे संस्थापक आणि हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक व कट्टर शिवसैनिक चंद्रशेखर पांडे यांनी शिवसेनेचे माजी आमदार आणि वर्तमान संपर्क प्रमुख गोपिकीसन बाजोरिया यांच्या पुढाकाराने घर वापसी केली. मुंबई येथे शिवसेना मुख्य नेते आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पांडे गुरुजींनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

अकोला जिल्हा परिषदेतील राजकारणात तत्कालीन अविभाजीत शिवसेनेचा प्रमुख चेहरा आणि स्वतःचे वेगळेपण राखून असलेले पांडे गुरुजींनी गत विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपाचा झेंडा हाती घेतला होता. स्वतःच्या जिल्हा परिषद मतदारसंघात विकास घडवून आणण्यासाठी भाजपात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र काही काळानंतर भाजपात घुसमट होत असल्याने ते भाजपाच्या सक्रिय राजकारणातून बाहेर पडले.

मध्यंतरी वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित होत असताना शिवसेना संपर्क नेते गोपीकिसन बाजोरिया यांनी गुरुजींचा शिवसेना प्रवेश घडवून आणला. अकोला जिल्हा परिषदेचे माजी सभापती पांडे गुरुजींच्या शिवसेना पक्ष प्रवेश करताना, जिल्हा परिषद माजी सदस्य व पातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळू पाटील तायडे यांच्यासहित शेकडो समर्थकांनी प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here